रणजी ट्रॉफी २०२२-२३ च्या हंगामातील सामना मुंबई आणि दिल्ली संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा ८ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर दिल्लीने प्रथम श्रेणी स्पर्धेत ४१ वर्षांनंतर मुंबईविरुद्ध विजय मिळवला. सरफराज खानने पहिल्या डावात १२५ धावा केल्या होत्या, तरी देखील मुंबईला पराभव पत्कारावा लागला.

या सामन्यात मुंबई संघाने पहिल्या डावात सरफराजच्या शतकाच्या जोरावर २९३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने ३६९ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबईचा संघ दुसऱ्या डावात केवळ १७० धावाच करू शकला. ज्याममध्ये सरफराज खान शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे दिल्लीला ९५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे दिल्ली संघाने २ गडी गमावून पूर्ण केले.

दिविज मेहराचे शानदार गोलंदाजी –

दिल्लीचा २० वर्षीय वेगवान गोलंदाज दिविज मेहराने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत एकूण ६ बळी घेतले. दुसऱ्या डावात सरफराज खानशिवाय त्याने पृथ्वी शॉला बाद केले. पहिल्या डावातही त्याने पृथ्वीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. पृथ्वीने पहिल्या डावात ४० तर दुसऱ्या डावात १६ धावा केल्या. दिल्लीबद्दल बोलायचे, तर पहिल्या डावात वैभव रावलने ११४ तर कर्णधार हिम्मत सिंगने ८५ धावा केल्या.

हेही वाचा – सारा तेंडुलकर की सारा अली खान? खोडकर चाहत्यांनी शुबमनला डिवचण्यासाठी ‘सारा’च्या दिल्या घोषणा; VIDEO व्हायरल

६ खेळाडू दुहेरी आकडादेखील गाठू शकले नाहीत –

मुंबईच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे, तर ६ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. कर्णधार अजिंक्य रहाणेने ५१ तर तनुष कोटियनने नाबाद ५० धावा केल्या. दिविज मेहराने १३ षटकात ३० धावा देत ५ बळी घेतले. दिल्लीकडून वैभव शर्माने दुसऱ्या डावात ३६ धावा केल्या. हृतिक शौकीनने नाबाद ३६ आणि नितीश राणाने ६ धावा केल्या. मुंबईचा हा ६ सामन्यांतील दुसरा पराभव आहे. संघाने ३ सामनेही जिंकले आहेत. ब गटात २३ गुणांसह संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्लीचा हा पहिला विजय आहे. तो ११ गुणांसह ५व्या स्थानावर आहे.

Story img Loader