Mumbai’s move towards Ranji victory after 8 years of discontinuity : रणजी ट्रॉफी २०२३-२४ हंगामातील विजेतेपदाचा सामना १० मार्चपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई आणि विदर्भ आमनेसामने आहेत. महाराजा रणजित सिंग यांच्या नावाने खेळल्या जाणाऱ्या ट्रॉफीचा पहिला हंगाम १९३४-३५ मध्ये झाला. तेव्हापासून मुंबईने ४१ वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर विदर्भ संघाने आतापर्यंत जेतेपदावर दोनदा नाव कोरलं आहे. सध्या सुरु असलेल्या सामन्यात मुंबई संघाची मजबूत पकड पाहायला मिळत आहे.
या शतकातच मुंबईने सात जेतेपदे जिंकली आहेत आणि केवळ ६ वेळा विजेतेपदाचा सामना गमावला आहे. सध्याचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी भरलेला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर यांच्यासह अनेक मोठी नावे आहेत, तर दुसरीकडे या स्पर्धेत विदर्भाने विरोधी संघांवर वर्चस्व गाजवत इथपर्यंत मजल मारली आहे. मात्र मागील आठ वर्षांपासून मुंबईला जेतेपदाचा दुष्काळ संपवत आला नाही. मुंबईने २०१६ मध्ये शेवटची ट्रॉफी जिकंली होती.
मुंबई अंतिम फेरीत फक्त ६ वेळा पराभूत –
मुंबईचा संघ आतापर्यंत केवळ ६ वेळा फायनलमध्ये पराभूत झाला आहे. १९४८-४९ च्या मोसमात प्रथमच, मुंबई अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर विजय मिळवू शकली नाही. २०२१-२२ च्या मोसमात मुंबई अंतिम फेरीत गेल्यावर पराभूत झाली होती. तेव्हा मुंबईला मध्य प्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा – IPL 2024 : ‘गुजरातला हार्दिकची उणीव भासणार नाही…’, माजी गोलंदाजाचे मोठं वक्तव्य
६ हंगामापासून विजेतेपदाची प्रतीक्षा –
रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदासाठी मुंबई सहा मोसमांपासून प्रतीक्षा करत आहे. गेल्या वेळी २०१५-१६ मध्ये सौराष्ट्रला पराभूत करून संघ चॅम्पियन बनला होता. अंतिम फेरीत प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी झालेले केवळ तीनच खेळाडू अद्याप संघात आहेत. त्यानंतर श्रेयस अय्यरने ११७ धावांची खेळी केली होती. शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. त्यावेळी धवल कुलकर्णीही संघात होता. त्यानंतर मुंबईने दोन फायनल गमावल्या आहेत. आत्तापर्यंत असे कधीच घडले नाही की मुंबईने सलग दोनदा फायनल गमावली आहे.
हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सला आयपीएलपूर्वी मोठा धक्का! सुरुवातीच्या काही सामन्यांना ‘हा’ स्टार खेळाडू मुकणार?
मुंबई फलंदाजांचा बालेकिल्ला –
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची फलंदाजी. मुंबईने भारतीय क्रिकेटला अनेक मोठे फलंदाज दिले आहेत. पॉली उमरीगर, अजित वाडेकर, विजय मर्चंट, सुनील गावसकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईचे आहेत. या रणजी मालिकेत रहाणे मुंबईचे कर्णधारही आहे. पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर यांसारखी मुंबईचे खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
हेही वाचा – World Cup 2024 : टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकातून झाला बाहेर
यंदाचा हंगाम मुंबईसाठी भयानक गेला आहे. कारण या हंगामात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉसारखे खेळाडू खास कामगिरी करु शकले नाही. त्यामुळे संघाला प्रत्येक वेळी विजयासाठी संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येक सामन्याला कोणीतरी संघासाठी उभं राहिलं आहे. मुंबईचा पहिला सामना बिहारमध्ये होता. हे स्टेडियम खंडर स्थितीत होतं आणि मुंबईच्या टीमला पाहायला प्रचंड गर्दी झाली होती. या सामन्यात रहाणे दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे या सामन्यांमध्ये मुंबईचे नेतृत्व शिवम दुबेने केले होते.
मुंबईकडे लंचपर्यंत ३८१ धावांची आघाडी –
सामन्याबद्दल बोलायचे, तर विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत आटोपला. मुंबईने दुस-या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात २६२ धावा केल्या आहेत. सध्या मुशीर खान आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. पृथ्वी शॉ ११ धावा करून, भूपेन लालवानी १८ धावा करून आणि अजिंक्य रहाणे ७३ धावा करून बाद झाले. यासह मुंबईने लंचपर्यंत ३८१ धावांची आघाडी घेतली आहे.