मुंबई : भारतीय कसोटी संघातील स्थान गमावलेल्या शार्दूल ठाकूरच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात आसामचा दोन दिवसांतच एक डाव आणि ८० धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या डावात सहा गडी बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाज शार्दूलने दुसऱ्या डावातही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना ३१ धावांत चार बळी मिळवले.

वांद्रे क्रीडा संकुल येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात यजमान मुंबईने आसामला पूर्णपणे निष्प्रभ केले. पहिल्या डावात आसामला ८४ धावांत गुंडाळणाऱ्या मुंबईने आपल्या पहिल्या डावात २७२ धावांची मजल मारली. त्यामुळे मुंबईला १८८ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर आसामच्या फलंदाजांचा दुसऱ्या डावातही मुंबईच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. आसामचा दुसरा डाव अवघ्या ३३ षटकांत १०८ धावांत संपुष्टात आल्याने मुंबईने दोन दिवसांत विजय मिळवला. यासह उपांत्यपूर्व फेरीसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचेही मुंबईच्या संघाने दाखवून दिले.

MUM vs BAR : मुंबईने बडोद्याविरुद्ध टेकले गुडघे; सलामीच्या लढतीतच अनपेक्षित पराभव
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
IND Vs BAN India vs Bangladesh 2nd T20 Match Team India Playing XI will change
IND vs BAN : दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल, दिल्लीत ‘लोकल बॉय’ करणार पदार्पण?
Juned Khan Cricket Career
Juned Khan : रिक्षाचालक ते चॅम्पियन मुंबईचा वेगवान गोलंदाज असा संघर्षमय प्रवास असणारा, कोण आहे जुनेद खान?
Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
India Bangladesh test match early closure on first day due to heavy rain sport news
पहिला दिवस पावसाचा; केवळ ३५ षटकांचा खेळ; बांगलादेश ३ बाद १०७
Rohit Sharma Gets Angry on Teammates Stump Mic Video Viral In IND vs BAN
VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड

हेही वाचा >>> Ranji Trophy 2024 : चेतेश्वर पुजाराने ‘बॅझबॉल’ शैलीत झळकावले दमदार शतक, टीम इंडियात परतण्याचे दिले संकेत

दुसऱ्या दिवशी ६ बाद २१७ धावांवरून पुढे खेळणाऱ्या मुंबईचा पहिला डाव २७२ धावांवर संपुष्टात आला. शिवम दुबेने एक बाजू लावून धरताना १४० चेंडूंत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावा केल्या. मात्र, त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही.

यानंतर आसामचा दुसरा डावही गडगडला. सुमित घाडीगावकर (नाबाद ३०) आणि अब्दुल कुरैशी (२२) यांचा अपवाद वगळता आसामचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. त्यामुळेच मुंबईला मोठा विजय साकारण्यासह ब-गटातील अग्रस्थान निश्चित करता आले.

संक्षिप्त धावफलक

* आसाम (पहिला डाव) : ८४

* मुंबई (पहिला डाव) : ६४.४ षटकांत सर्वबाद २७२ (शिवम दुबे नाबाद १२१, शम्स मुलानी ३१; दिबाकर जोहरी ५/७४, राहुल सिंह २/४२)

* आसाम (दुसरा डाव) : ३३ षटकांत सर्वबाद १०८ (सुमित घाडीगावकर नाबाद ३०, अब्दुल कुरैशी २२; शार्दूल ठाकूर ४/३१, मोहित अवस्थी २/१०, तुषार देशपांडे २/३७)

शार्दूल ठाकूर