Ranji Trophy 2025 MUM vs MEG : मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये गतविजेत्या मुंबईने मेघालयाचा एक डाव आणि ४५६ धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात मेघालय संघ प्रथम फलंदाजी करताना ८६ धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात मुंबईने पहिला डाव ७ बाद ६७१ धावांवर घोषित केला होता. यानंतर दुससऱ्या डावात मेघालयचा संघ १२९ धावांवर गारद झाला या विजयामुळे मुंबईचे २९ गुण झाले आहेत. या सामन्यात मुंबईला आता बाद फेरीत पोहोचण्यासाठी अन्य दोन अव्वल संघांच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागणार आहे. या सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी शार्दुल ठाकुरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शार्दुलने ८४ धावांच्या खेळीत ५ षटकार आणि ९ चौकार लगावले –

या सामन्याच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने मेघालयविरुद्ध हॅट्ट्रिक घेत ४ फलंदाजांना शून्यावर बाद केले. त्यानंतर मेघालयविरुद्ध पहिल्या डावात फलंदाजी करताना शार्दुलने वेगवान फलंदाजी करत प्रथम ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर ४२ चेंडूत ८४ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान शार्दुलने ५ षटकार आणि ९ चौकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट २००.०० होता. यानंतर दुसऱ्या डावातही गोलंदाजी करताना शार्दुलने ४८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

मुंबईकडून तीन फलंजांनी झळकावली शतकं –

मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने ४३ धावांवर २ विकेट गमावल्या, मात्र त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सिद्धेश लाडने शानदार खेळी करत १४५ धावा केल्या. एक षटकार आणि १७ चौकार मारले. कर्णधार अजिंक्य रहाणेने ९६ धावा करून बाद झाला आणि अवघ्या ४ धावांनी त्याचे शतक हुकले. पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संघाचा यष्टीरक्षक आकाश आनंदनेही शतक झळकावले आणि १५ चौकारांच्या मदतीने १०३ धावा केल्यानंतर तो बाद झाला. श्रेयांश शेडगेनेही ६१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यानंतर शार्दुल ठाकूरनेही (८४) दमदार खेळी केली आणि त्याचे शतक हुकले.

शम्स मुलानीने ८६ चेंडूत १४चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. या सामन्यात मुंबईकडून तीन फलंदाजांनी शतकं झळकावली. ज्यामुळे मुंबई संघाने ७ बाद ६७१धावा करून डाव घोषित केला. मुंबईला पहिल्या डावात एकूण ५८८ धावांची आघाडी मिळाली. या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईसाठी शम्स मुलानी व्यतिरिक्त सिद्धेश आणि आकाशने शतकी खेळी खेळली. विषेष मेघालयाच्या एकाही फलंदाजाला दोन्ही डावात अर्धशतकही झळकावता आले नाही.