Ranji Trophy 2025 Mumbai vs Jammu Kashmir : रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप २०२४-२५ मध्ये मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही मुंबईच्या फलंदाजांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण हे दोन खेळाडू खेळपट्टीवर फार काळ टिकू शकले नाहीत. सर्वप्रथम, रोहित शर्मा दुसऱ्या डावात अवघ्या २८ धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी चाहत्यांची निराशा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईचे फलंदाज पुन्हा ठरले अपयशी –

दुसऱ्या डावात मुंबईची फलंदाजी पुन्हा एकदा कमकुवत दिसून आली. यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावातही चांगली सुरुवात केली. मात्र, त्याला आपल्या खेळीचे मोठ्या डावात रुपांतर करता आले. रोहित शर्मानंतर यशस्वी जैस्वालही २६ धावा करून बाद झाला.त्याचबरोबर श्रेयस अय्यरने पहिल्या डावात ११ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावातही अय्यर काही खास फलंदाजी करू शकला नाही. तो केवळ १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विशेष म्हणजे शिवम दुबे दोन्ही डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला.

शिवम दुबे सामन्याच्या दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. पहिल्या डावात दुबेने केवळ तीन चेंडूंचा सामना केला आणि तो खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुस-या डावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू ४ चेंडूंचा सामना केला पण खाते उघडता आले नाही. यापूर्वी दुबे मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता. अशा प्रकारे दुसऱ्या डावात मुंबईने अवघ्या ८६ धावांत ५ विकेट गमावल्या.

मुंबईचा संघ पराभवाच्या छायेत –

पहिल्या डावात मुंबईचा संघ पहिल्या दिवशी अवघ्या १२० धावांत गारद झाला होता. मुंबईकडून फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. याशिवाय तनुष कोटियनने २६ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरा जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात फलंदाजी करताना २०६ धावा केल्या. आता मुंबईचा दुसरा डावही अडचणीत सापडल्याने सामना गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy 2025 yashasvi jaiswal shreyas iyer shivam dube flop in mumbai vs jammu kashmir match vbm