कर्नाटकच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचे पहिले तीन मोहरे अवघ्या ९० धावांमध्ये तंबूत धाडून थरार निर्माण केला. परंतु चिराग खुराणा व अंकित बावणे यांनी कसदार फलंदाजांप्रमाणे आत्मविश्वासाने खेळ करीत हा थरार थोपविला. त्यामुळेच महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात ५ बाद २७२ धावांची मजल मारता आली.
उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या या लढतीत नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राच्या बाजूने लागल्यावर कर्णधार रोहित मोटवानीने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र त्याचा अपेक्षेइतका फायदा महाराष्ट्राला घेता आला नाही. खराब सुरुवातीनंतर खुराणा (६४) व अंकित बावणे (नाबाद ८९) यांनी खेळपट्टीबाबत बाऊ करण्याची आवश्यकता नाही, याचाच प्रत्यय घडवत संघाला सुस्थितीत नेले. खराब प्रारंभामुळे महाराष्ट्राच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अपेक्षेइतकी आक्रमक फलंदाजी करता आली नाही. एकेरी व दुहेरी धावांवरच त्यांना अधिकाधिक भर द्यावा लागला. पहिल्या सत्रात कर्नाटकच्या गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले. त्यांचा कर्णधार आर. विनय कुमारने वेगवान गोलंदाजांना छोटे-छोटे ‘स्पेल’ देत महाराष्ट्राच्या फलंदाजांवर दडपण ठेवले.
राष्ट्रीय निवड समितीच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या हर्षद खडीवाले, विजय झोल व केदार जाधव यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. खडीवाले (१५) व झोल (५) यांनी सपशेल निराशा केली. खडीवाले हा या मोसमातील एक हजार धावांचा टप्पा पार करील असे वाटले होते, मात्र त्यासाठी पाच धावा कमी असतानाच तो बाद झाला. अंतिम सामन्याचे दडपण त्यांच्यावर होते, हे त्यांनी केलेल्या चुकांवरून स्पष्ट झाले.
महाराष्ट्राला खुराणा, बावणेने सावरले!
कर्नाटकच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचे पहिले तीन मोहरे अवघ्या ९० धावांमध्ये तंबूत धाडून थरार निर्माण केला. परंतु चिराग खुराणा व अंकित बावणे यांनी कसदार फलंदाजांप्रमाणे आत्मविश्वासाने खेळ करीत हा थरार थोपविला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-01-2014 at 01:16 IST
TOPICSकर्नाटकKarnatakaक्रिकेट न्यूजCricket Newsक्रीडाSportsमहाराष्ट्रMaharashtraरणजी ट्रॉफीRanji Trophy
+ 1 More
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy ankit bawne holds fort