कट्टर प्रतिस्पर्धी रेल्वेवर अटीतटीच्या उपांत्यपूर्व लढतीत क्रिकेटवेडय़ा बंगालने ४८ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत बंगालची गाठ महाराष्ट्राशी पडणार आहे. बंगालच्या विजयात कर्णधार लक्ष्मी रतन शुक्लाने अष्टपैलू कामगिरी करत मोलाचा वाटा उचलला. शुक्ला (७६) आणि वृद्धिमान साहा (८१) यांच्या खेळींच्या जोरावर बंगालने दुसऱ्या डावात २६७ धावा करत रेल्वेपुढे २७१ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगालच्या भेदक माऱ्यापुढे रेल्वेचे आव्हान २२२ धावांमध्येच संपुष्टात आले. शुक्लाने या वेळी सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. आता १८ ते २२ जानेवारीदरम्यान महाराष्ट्र वि. बंगाल (इंदूर) आणि पंजाब वि. कर्नाटक (मोहाली) असे उपांत्य फेरीचे सामने होतील.
बंगालची गाडी सुसाट; रेल्वेवर मात
कट्टर प्रतिस्पर्धी रेल्वेवर अटीतटीच्या उपांत्यपूर्व लढतीत क्रिकेटवेडय़ा बंगालने ४८ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.
First published on: 13-01-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy bengal trump railways enter semis