Ranji Trophy Final 2024, Vidarbha vs Mumbai : रणजी ट्रॉफी २०२३-२४ हंगामातील विजेतेपदाचा सामना १० मार्चपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई आणि विदर्भ आमनेसामने आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भ संघाचा डाव १०५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात मुंबई मुशीर खानच्या शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या ९५ धावांच्या जोरावर सर्वबाद ४१८ धावांचा डोंगर उभारला आणि विदर्भासमोर ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विदर्भाने तिसऱ्या दिवस संपेपर्यंत २ षटकानंतर बिनबाद १० धावा केल्या असून ५२८ धावांची गरज आहे. सध्या अथर्व (३) आणि ध्रुव (७) नाबाद आहेत.

मुशीर खानने झळकावले शतक –

मुशीर खानने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईकडून खेळतताना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सामन्याच्या दुसऱ्या डावात आपले अर्धशतक पूर्ण केले होते आणि तिसऱ्या दिवशी तो फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या नजरा फक्त शतकावर होत्या. प्रथम, त्याने आपला कर्णधार अजिंक्य रहाणेसह आपला डाव पुढे नेला. त्यानंतर रहाणे (७३) बाद झाल्यावर त्याने श्रेयस अय्यरशी चांगले भागीदारी केली. या दरम्यान त्याने २५५ चेंडूत आपले दुसरे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले. त्याने ३२६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १३६ धावांचे योगदान दिले.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

मुशीर आणि श्रेयसची १६८ धावांची भागीदारी –

मुशीर खानने आपल्या झंझावाती खेळीसह श्रेयस अय्यरबरोबर १६८ धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयस अय्यरचे अवघ्या पाच धावांनी शतक हुकले. त्याने १११ चेंडूत १० चौकार ३ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. त्याचबरोबर शम्स मुलाणीने ८५ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. अशा प्रकारे मुंबई संघाने १३०.२ षटकांत सर्वबाद ४१८ धावा केल्या आणि ५३८ धावांची आघाडी घेतली. विदर्भाकडून हर्ष दुबेने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय यश ठाकुरने ३ तर मोखाडे आणि ठाकरेंनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – Player of the Month : यशस्वी जैस्वालने पटकावला आयसीसीचा पुरस्कार, विल्यमसन आणि निसांकाला टाकले मागे

सचिनचा विक्रम त्याच्यासमोरच मोडला –

१९ वर्षे आणि १४ दिवस वयाच्या मुशीरने रणजी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज म्हणून सचिनचा विक्रम मोडला. त्याच्या २२ व्या वाढदिवसाच्या एक महिना आधी, तेंडुलकरने १९९४-९५ हंगामाच्या अंतिम सामन्यात पंजाबविरुद्ध दुहेरी शतक झळकावले. त्याने आपल्या संघाला विजेतेपद दिले होते. योगायोगाने वानखेडेवर विदर्भ आणि मुंबई यांच्यातील अंतिम सामन्यात सचिन स्टँडवर उपस्थित होता.