Hanuma Vihari Ranji Trophy: असं म्हणतात ज्याच्यात स्वप्न पूर्ण करण्याची धमक असते तेच या जगात स्वत: ला सिद्ध करून दाखवतात. फक्त माकडउड्या मारून काहीही साध्य होत नसते तर स्वप्न साकार करण्यासाठी स्वत:च्या हिंमतीवर प्रयत्न यशस्वी करणे गरजेचे असते. भारतीय फलंदाज हनुमा विहारीनेही असेच उदाहरण जगासमोर ठेवत स्वत: ला सिद्ध केले आहे. या खेळाडूने भारतीय देशांतर्गत क्रिकेट रणजी ट्रॉफीमध्ये असे धाडस दाखवले आहे, ज्याची चाहत्यांना आणि इतर दिग्गजांनाही खात्री पटली आहे. वास्तविक, रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या संघांमध्ये सामना होत आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आंध्र संघाचा कर्णधार हनुमा विहारी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारी दुखापतीमुळे एका हाताने डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसला. आंध्र प्रदेशच्या पहिल्या डावात कर्णधार विहारी जखमी झाला होता. मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खानच्या बाऊन्सरने त्याच्या मनगटाला दुखापत झाली. त्याचे मनगट तुटल्याचे (फ्रॅक्चर) झाल्याचे नंतर उघड झाले. संघाची ९वी विकेट पडल्यानंतर विहारी फलंदाजीसाठी मैदानात आला.
तुटलेल्या मनगटाने का केली बॅटिंग? फलंदाजीमागील रहस्य उलगडले
याविषयी बोलताना हनुमा विहारी म्हणाला, “जेव्हा विकेट पडत होत्या, तेव्हा मला काहीच कळत नव्हते,त्यावर मी स्वत: ला विचारले ‘डाव्या हाताने फलंदाजी का करू शकत नाही?’ तुम्हाला माहित नाही की मी १०-१५ चेंडूंचा सामना केला तर किमान १० अतिरिक्त धावांचा फरक पडेल. संघासमोर एक उत्तम उदाहरण मांडण्याचा माझा मुख्य हेतू होता. जर मी हार मानली तर संघभावना कमी झाली असती.” विहारीने पहिल्या डावात ५७ चेंडूत २७ धावांची खेळी केली होती. यानंतर त्याने मोडलेल्या मनगटाने ३७ चेंडूत १६ धावा केल्या आणि रिटायर्ड हर्ट झाला.
आतापर्यंतचा सामना कसा झाला?
या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेश संघाने ३७९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेश पहिल्या डावात २२८ धावांत गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या आंध्र प्रदेशला १०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही आणि ९३ धावांत सर्वबाद झाला. आज सामन्याचा तिसरा दिवस असून आता मध्य प्रदेशला विजयासाठी २४५ धावांची गरज आहे.