Ranji Trophy 2024-25: भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ भारतीय संघासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली. संपूर्ण मालिकेत भारताची फलंदाजी फळी धावा करण्यात अपयशी ठरली. या मालिकेनंतर भारतीय संघाच्या बऱ्याच खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेत, २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या रणजी ट्रॉफीच्या एलिट गट सामन्यांमध्ये खेळताना दिसत आहेत. रोहित शर्मा १० वर्षांनी रणजी सामना खेळायला उतरला आहे. मुंबईच्या संघात ६ भारताचे खेळाडू खेळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियानंतर घरच्या मैदानावरही भारताचे खेळाडू नापास झाले आहेत. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, शुबमन गिल हे खळाडू आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी सामन्यात खेळण्यासाठी उतरले खरे पण मोठी कामगिरी करू शकले नाहीत. रोहित शर्मा ३ धावांवर, ऋषभ पंत १ धाव करून, यशस्वी जैस्वाल ४ धावा करून तर शुबमन गिलही ४ धावा करत माघारी परतले. तर श्रेयस अय्यर ११ धावा करत बाद झाला. पण श्रेयस अय्यरने ७ चेंडूत एक षटकार आणि एका चौकारासह ११ धावा करत आपला फॉर्म दाखवून दिला. पण जम्मू काश्मीरच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचा हा स्टार खेळाडू बाद झाला.

चॅम्पियन्स ट्रॉफी तोंडावर आलेली असताना भारतीय संघाचे हे स्टार खेळाडू फलंदाजीत फेल झालेले पाहून टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या १९ फेब्रुवारीपासून खेळवली जात असून भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघात असलेले बरेचसे खेळाडू रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. पण आता रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत हे खेळाडू फेल झाल्याने भारताची फलंदाजी फळी कमकुवत असल्याचे चित्र दिसत आहे. तर अष्टपैलू रवींद्र जडेजादेखील सौराष्ट्रकडून दिल्लीविरूद्ध सामन्यात खेळत आहे. जिथे त्याने आतापर्यंत २ विकेट्स घेतले आहेत.

रणजी ट्रॉफीचे २३ जानेवारीपासून सुरू झालेले सामने

मेघालय वि. ओडिशा
गोवा वि. नागालँड
आसाम वि. रेल्वे
त्रिपुरा वि. सर्व्हिसेस
बंगाल वि. हरियाणा
बिहार वि. उत्तरप्रदेश
छत्तीसगढ वि. झारखंड
तामिळनाडू वि. चंदीगढ
मध्यप्रदेश वि. केरळ
दिल्ली वि. सौराष्ट्र
विदर्भ वि. राजस्थान
पंजाब वि. कर्नाटक
महाराष्ट्र वि. बडोदा
मुंबई वि. जम्मू काश्मीर
आंध्रा वि. पुदुच्चेरी
हैदराबाद वि. हिमाचल प्रदेश
उत्तराखंड वि. गुजरात

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy india players rohit sharma yashasvi jaiswal rishabh pant shubman gill failed in elite group matches bdg