देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस
Ranji Trophy Haryana Vs Mumbai Quarter Final Match: रणजी ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीचे सामने येत्या ८ फेब्रुवारीपासून खेळवले जाणार आहेत. मुंबई वि हरियाणा, जम्मू काश्मीर वि केरळ, सौराष्ट्र वि गुजरात आणि विदर्भ वि तमिळनाडू या संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. हे चारही सामने विविध ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तर मुंबईचा सामना हा लाहलीमध्ये होणार होता. पण आता अचानक सामन्याचं ठिकाण बदललं आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ‘अपरिहार्य परिस्थिती’चे कारण देत शेवटच्या क्षणी मुंबई आणि हरियाणा यांच्यातील रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीचे ठिकाण बदलले आहेत. लाहलीऐवजी आता कोलकाता येथे हा सामना खेळवला जाणार आहे. बीसीसीआयचे गेम डेव्हलपमेंट मॅनेजर (जीडीएम) अभय कुरुविला यांनी हरियाणा क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांना या बदलाची माहिती दिली आहे. एमसीएने आपल्या १८ सदस्यीय संघासाठी आधीच फ्लाइट तिकीट बुक केले होते आणि ते बुधवारी सकाळी दिल्लीला रवाना होणार होते.
एमसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरियाणा आणि मुंबई यांच्यातील रणजी सामना जो लाहलीमध्ये खेळवला जाणार होता, तो सामना आता अपरिहार्य परिस्थितीमुळे कोलकातामधील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाईल, अशी माहिती आम्हाला इमेलद्वारे कळवण्यात आली. बंगाल क्रिकेट असोसिएशन सर्व बदलांची आणि तयारीची काळजी घेत आहे.
रणजी सामन्याचं ठिकाण का बदलण्यात आलं यामागे कोणतही अधिकारिक निर्णय देण्यात आलेलं नाही. पण थंडी आणि धुकं हे ठिकाण बदलण्याचे कारण असू शकते. जम्मू आणि काश्मीरचा संघ केरळविरूद्ध त्यांचा उपांत्य फेरीचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर होणार होता. पण त्याऐवजी हा सामना सारख्याच कारणांमुळे आता पुण्यात खेळवला जाणार आहे.
हरियाणाविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ
अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, अमोघ भाटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सुर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉस्टन डायस, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.
रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचं वेळापत्रक
८ ते १२ फेब्रुवारी २०२५- सौराष्ट्र वि गुजरात – सकाळी ९.३० वाजता
८ ते १२ फेब्रुवारी २०२५- हरियाणा वि मुंबई – सकाळी ९.३० वाजता
८ ते १२ फेब्रुवारी २०२५- विदर्भ वि तमिळनाडू – सकाळी ९.३० वाजता
८ ते १२ फेब्रुवारी २०२५- जम्मू काश्मीर वि केरळ – सकाळी ९.३० वाजता