मुंबईच्या कुचकामी फलंदाजीचे पितळ पुन्हा एकदा साऱ्यांसमोर उघडे पडले. रेल्वेने बुधवारी त्यांचा पहिल्या डावात अवघ्या १०१ धावांमध्ये खुर्दा उडवला. रेल्वेच्या २४२ धावांचा पाठलाग करताना सामन्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईचा पहिला डाव शतकाची वेस ओलांडल्यावर लगेचच आटोपला. त्यामुळे रेल्वला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळाले, तर मुंबईला एका गुणावर समाधान मानावे लागले.
मुंबईची ९ बाद ७० अशी अवस्था असताना त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी ९२ धावांची गरज होती. त्या वेळी बोटाला दुखापत झालेला जावेद खान फलंदाजीला उतरला आणि त्याने ६ चौकारांच्या जोरावर नाबाद २७ धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला फॉलोऑनची नामुष्की टाळता आली. जावेदच्या सर्वोत्तम धावसंख्येसहित चार फलंदाजांना दोनअंकी धावसंख्या करता आल्या. रेल्वेकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक चार बळी मिळवले. मुंबईने ४ बाद ५२ वरून पुढील १८ धावांमध्ये पाच फलंदाज गमावले. रेल्वेने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेपर्यंत ४ बाद १३६ अशी मजल मारली.
दुसऱ्या सामन्यानंतर मुंबईकडे एकमेव गुण
मुंबईच्या कुचकामी फलंदाजीचे पितळ पुन्हा एकदा साऱ्यांसमोर उघडे पडले. रेल्वेने बुधवारी त्यांचा पहिल्या डावात अवघ्या १०१ धावांमध्ये खुर्दा उडवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-12-2014 at 04:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy mumbai holds only a point