मुंबई आणि रेल्वे यांच्यात नवी दिल्लीत सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला खराब वातावरणाचा फटका बसला. पहिल्या दिवसअखेर ८.२ षटकांचा खेळ झाला असून रेल्वेने २ बाद २५ धावा केल्या आहेत.
खराब वातावरणामुळे मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने दुसऱ्याच चेंडूवर मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने असद पठाणला दुसऱ्या स्लिपमध्ये सूर्यकुमारकरवी झेलबाद केले. वेगवान गोलंदाज जावेद खाननेही या वातावरणाचा फायदा उठवत अभिषेक कौशिकला (४) यष्टिरक्षक आदित्य तरेकडे झेल देण्यास भाग पाडले. अंधुक प्रकाशामुळे पंच ए. नंदकिशोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल विल्सन यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेर कर्णधार नितीन भिल्ले नाबाद ४ तर अरिंदम घोष (०) मैदानावर खेळत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा