वानखेडेवर सुरू असलेल्या रणजी रणधुमाळीत मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्याने रंजक रुप धारण केले आहे. दुसऱया डावात मुंबईचा निम्मा संघ स्वस्तात माघारी परतला असून मुंबईची धावसंख्या ५ बाद ३९ अशी आहे. तरीही मुंबईकडे अजून १६१ धावांची आघाडी आहे.
ठाकूरची ‘गब्बर’ कामगिरी!
मुंबईच्या तडफदार ४०९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा संघ अवघ्या २८० धावांत गारद झाला होता. त्यानंतर सामन्यात आघाडी असलेल्या मुंबईच्या फलंदाजांची दुसऱया डावात धमक दिसली नाही. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाच्या बळावर मुंबईच्या निम्म्या संघाला तंबूत धाडले आहे. त्यामुळे सामन्याला नवे वळण मिळाले आहे. अजूनही मुंबईकडे आघाडी असली तरीसुद्धा पुढील पाच विकेट्सही स्वस्तात बाद झाल्यास महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी सोयीस्कर लक्ष्य मिळेल. त्यामुळे मुंबईच्या उर्वरीत फलंदाजांना सावधगिरीने कामगिरी करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा