इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा आणि करोना महामारीमुळे खंडीत झालेल्या रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून सुरू झाले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघ आपापसात भिडले आहेत. चारही सामने ६ जून ते १० जून या कालाधीत बेंगळुरूमध्ये खेळवले जात आहेत. पण, येत्या चार दिवसांत बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यांवर पावसाचे सावट असणार आहे.

उपात्यंपूर्व सामना १ – बंगाल विरुद्ध झारखंड

बाद फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी एलिट ग्रुप बी मधील तीनही सामने जिंकणारा बंगाल हा एकमेव संघ आहे. पहिल्यांद उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या झारखंडसोबत त्यांची लढत सुरू आहे. झारखंडने नाणेफेक जिंकून बंगालला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

उपात्यंपूर्व सामना २ – मुंबई विरुद्ध उत्तराखंड

४१ वेळच्या विजेत्या मुंबईपुढे उत्तराखंडचे आव्हान आहे. या सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईचे नेतृत्व करत आहे. मुंबई विरुद्ध उत्तराखंड सामना ओल्या आउटफिल्डमुळे उशिरा सुरू झाला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.

उपात्यंपूर्व सामना ३ – कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश

कर्नाटकसमोर उत्तर प्रदेशचे तगडे आव्हान आहे. उत्तर प्रदेशच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे आऊटफिल्ड ओले झाल्याने नाणेफेकीला उशीर झाला. देवदत्त पडिक्कल, करुण नायर, मनीष पांडे आणि मयंक अग्रवाल हे भारतीय संघात खेळलेले खेळाडू कर्नाटकच्या संघात आहेत. त्यांना आयपीएलमधील तारांकित खेळाडू असलेले मोहसीन खान आणि यश दयाल यांच्या गोलंदाजीचा सामना करावा लागत आहे.

उपात्यंपूर्व सामना ४ – पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश

पंजाब संघाने नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अलूर येथे सुरू असलेल्या या सामन्यात आउटफिल्ड ओले झाल्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. अनुभवी सलामीवीर शुभमन गिल वैयक्तिक ९ धावांवर पुनीत दातेच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Story img Loader