वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबईकडून मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकर याने आज बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावलं आहे.
सचिनने वसिम जाफर याच्या सोबत तिस-या विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी करत २ बळींच्या बदल्यात मुंबईला २५४ धावांची मजल मारून दिली. जाफरनेही तडाखेबाज फलंदाजी करत १२९ धावा ठोकल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सचिनचं हे ८० वं शतक आहे. आता सचिन सुनिल गावसकर यांच्या ८१ शतकांच्या विक्रमापासून फक्त १ शतक दूर आहे.
सचिन तेंडुलकर, कर्णधार अजित आगरकर आणि सलामीवीर वासिम जाफर या सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंच्या समावेशामुळे मुंबईची बाजू भक्कम आहे. सलामीवीर वासिम जाफरच्या साथईने सचिनने दमदार फटकेबाजी केली. या जोडिने मुंबईसाठी नाबाद शतकी भागीदारी केली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर बडोद्याविरुद्धच्या सामन्यात मोठया विश्रांतीनंतर खेळत आहे. सचिनची आजची खेळी म्हणजे आगामी ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहे असं म्हणता येईल.
रणजी करंडक स्पर्धा : बडोद्याविरूध्द सचिनचं शतक
वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबईकडून मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकर याने आज बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-01-2013 at 03:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy sachin scored century against baroda