रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०१९-२० च्या हंगामात मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ अशी ख्याती असलेल्या मुंबईवर १० गडी राखून रेल्वेने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे बलाढ्य कर्नाटक विरुद्धच्या आगामी रणजी सामन्यात कसोटी ‘स्पेशालिस्ट’ अजिंक्य रहाणेसोबतच युवा फलंदाज सर्फराज खानही मुंबईकडून खेळणार आहे. रेल्वेविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा पराभव पदरी आल्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांच्यावर टीका झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाचे काणतेही सामने नसताना भारताचे हे दोन खेळाडू मुंबईकडून खेळले नव्हते. आता मात्र भारताची श्रीलंकेविरूद्धची मालिका असल्याने हे दोघेही भारतीय संघाकडून खेळणार आहेत. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यासाठी हे दोघे उपलब्ध नसतील. अशा परिस्थितीत मुंबईच्या अजिंक्य रहाणेला सूर गवसणे आवश्यक आहे.

मुलगी आरती करते, म्हणून टीव्हीच फोडून टाकला – शाहिद आफ्रिदी

मुंबईचा संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, सर्फराज खान, शुभम रांजणे, आकाश पारकर, सिद्धेश लाड, शाम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक आतार्डे, रॉयस्टन डायस, तुषार देशपांडे, दीपक शेट्टी, एकनाथ केरकर.

४ दिवसांचा होणार कसोटी सामना? ICC चा नवा प्रस्ताव

गेल्या सामन्यात मुंबईचा झाला होता लाजिरवाणा पराभव

वानखेडे स्टेडियमवर तीन दिवसांत संपलेल्या ब गटातील सामन्यात रेल्वेने पहिल्याच दिवशी सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करताना मुंबईचा पहिला डाव ११४ धावांवर गुंडाळला. त्यानंतर कर्णधार कर्ण शर्माच्या (नाबाद ११२) झुंजार शतकाच्या बळावर रेल्वेने पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानपुढे (६० धावांत ५ बळी) मुंबईचा दुसरा डाव १९८ धावांत गडगडला. विजयासाठी ४७ धावांचे तुटपुंजे आव्हान रेल्वेने १२ व्या षटकातच साधले. सलामीवीर मृणाल देवधर (नाबाद २७) आणि प्रथम सिंग (नाबाद १९) यांनी रेल्वेला १० गडी राखून विजय मिळवून देत एका बोनस गुणाची भरसुद्धा घातली.

ICC Test Rankings : कोहली ‘किंग’; अश्विन, शमीची ‘टॉप १०’ मध्ये उडी

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ११४
रेल्वे (पहिला डाव) : २६६
मुंबई (दुसरा डाव) : सर्व बाद १९८ (सूर्यकुमार यादव ६५, आकाश पारकर नाबाद ३५; हिमांशू सांगवान ५/६०)
रेल्वे (दुसरा डाव) : बिनबाद ४७ (मृणाल देवधर नाबाद २७)
सामनावीर : कर्ण शर्मा

Story img Loader