महाराष्ट्र व केरळ यांच्यातील सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य लढतीस मंगळवारपासून येथे प्रारंभ होत आहे.
केरळला स्थानिक वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा असली तरी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हे लक्षात घेता चार दिवसांचा हा सामना चुरशीने खेळला जाईल असा अंदाज आहे.
महाराष्ट्राचे नेतृत्व स्वप्नील गुगळे करीत आहे. त्याने या मोसमात एका द्विशतकासह धावांचा पाऊस पाडला आहे. त्याला फलंदाजीत राहुल त्रिपाठी, नौशाद शेख, शुभम रांजणे, तुषार श्रीवास्तव, विशांत मोरे यांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. गोलंदाजीत रांजणे, निकित धुमाळ, सत्यजित बच्छाव, अक्षय वाईकर यांच्यावर महाराष्ट्राची भिस्त आहे.
केरळच्या फलंदाजीची मुख्य मदार पी.एम.जिग्नेश, के.एस.मोनीष, एस.मोहन, एन.सुरेंद्रन यांच्यावर आहे. गोलंदाजीत संदीप वॉरियर, एन.श्रीनिवास, एम.एस.अखिल यांच्याकडून त्यांना प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.
संघ-महाराष्ट्र-स्वप्नील गुगळे (कर्णधार), तुषार श्रीवास्तव, नौशाद शेख, राहुल त्रिपाठी, चेतन कुरंदले, शुभम रांजणे, अक्षय वाईकर, विशांत मोरे, निखिल नाईक, सत्यजित बच्छाव, समीर खोडवे, राहुल शर्मा, जितेंद्र पाटील, अवधूत दांडेकर, निकित धुमाळ.
केरळ-सी.महंमद खान (कर्णधार), एस.मोहन, सी.पी.रिझवान, पी.जिग्नेश, पी.एन.अनफाळ, के.एस.मोनीष, व्ही.मनोहरन, एन.सुरेंद्रन, एम.एस.अखिल, संदीप वॉरियर, एन.श्रीनिवास, एन.पी.कुमार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा