बीसीसीआयच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये मानाचं स्थान असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेत यंदा मुंबईच्या संघाची चांगली सुरुवात झालेली नाहीये. रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या मुंबईला यंदा एकही सामना जिंकता आलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईवर ९ गडी राखून मात केली. काही ठराविक खेळाडूंचा अपवाद वगळता मुंबईचा संघ या सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे भानावर आलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने आगामी महाराष्ट्राविरुद्ध सामन्यासाठी मुंबईच्या संघाची घोषणा केली आहे. सिद्धेश लाडकडे या संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं असून, गुजरातविरुद्ध सामन्याचा कर्णधार धवल कुलकर्णीला संघात जागा देण्यात आलेली नाहीये. ६ ते ९ डिसेंबर दरम्यान पुण्यामध्ये हा सामना रंगणार आहे.
महाराष्ट्राविरुद्ध सामन्यासाठी असा असेल मुंबईचा संघ –
सिद्धेश लाड (कर्णधार), आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, जय बिस्ता, शिवम दुबे, एकनाथ केरकर, अरमान जाफर, कर्ष कोठारी, आकाश पारकर, शुभम रांजणे, ध्रुवील मटकर, भुपेन ललवानी, शिवम मल्होत्रा, रोस्टन डायस, मिनाद मांजरेकर
अवश्य वाचा – सिद्देश लाडचा अमोल मुझुमदार करू नका; गावसकर यांनी टोचले BCCI चे कान