Ranji Trophy New Bowling Sensation M Venkatesh: एम व्यंकटेश हा १२वा खेळाडू होता आणि तो मैदानावर आपल्या सहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन जायचा, परंतु अचानक एका क्षणात सर्वकाही बदलले. व्यंकटेशच्या कर्नाटक संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल याने त्याला वासुकी कौशिक दुखापतग्रस्त झाल्यामुळे गोलंदाजी करण्यास सांगितले. २२ वर्षीय व्यंकटेश हे ऐकून खूप आनंदी झाला होता कारण हा त्याचा पहिलाच सामना होता पण तो तितकाच घाबरला होता. त्याच्याकडे तयारी करण्यासाठी किंवा काहीही समजून घेण्यासाठी फारसा वेळ नव्हता आणि त्याला गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागले.

वासुकी कौशिकची दुखापत व्यंकटेशच्या पथ्यावर पडली. अष्टपैलू असा वेगवान गोलंदाज (उजव्या हाताचा मध्यम) आणि फलंदाज असलेल्या व्यंकटेशने कर्णधाराने दिलेल्या या संधीचा जोरदार फायदा घेतला. सामन्यात अशी जबरदस्त गोलंदाजी केली विरोधी संघातील फलंदाजांना हैराण करून सोडले. एम व्यंकटेशने १४ षटकांत अवघ्या ३६ धावांत ५ बळी घेत उत्तराखंडची फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली. त्याने आपल्या स्पेलमध्ये तीन निर्धाव षटकेही टाकली. पदार्पणाच्या रणजी सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो कर्नाटकचा १२वा गोलंदाज ठरला आहे.

उत्तराखंडच्या गोलंदाजांचा कहर करून व्यंकटेश तुटून पडला

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकचा सामना उत्तराखंडशी होत आहे. लाजाळू पण आत्मविश्वासू आणि उत्साही व्यंकटेश मैदानावर आपल्या अप्रतिम गोलंदाजीद्वारे एकामागून एक फलंदाजांना खिळवून ठेवत होता. आपल्या आयुष्यातील या संस्मरणीय दिवसानंतर, म्हैसूरचा असणारा हा खेळाडू म्हणाला, “मी खूप आनंदी आणि चिंताग्रस्त अशा द्विधा मनस्थितीत होतो. मी आज खेळतोय हे घरच्यांना सांगायलाही माझ्याकडे वेळ नव्हता.

हेही वाचा: IND vs AUS: उस्मान ख्वाजाचे ‘या’ कारणाने फ्लाईट मिस, कांगारू फलंदाजाची इंस्टाग्रामवर मजेशीर पोस्ट व्हायरल

उजव्या हाताच्या असणाऱ्या या मध्यमगती गोलंदाज असलेल्या वेंटकेशनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. एम. वेंकटेशने १४ षटकं टाकली. यामध्ये त्याने केवळ ३६ धावा देत फलंदाजी करणाऱ्या संघातील ५ गड्यांना तंबूत पाठवलं. उत्तराखंडच्या फलंदाजांना वेंटकेशची गोलंदाजी कळतच नव्हती त्यांची अक्षरशः पळताभुई थोडी झाली होती.

व्यंकटेश संगीतकार आणि कलाकारांच्या कुटुंबातून येतो

सामन्याच्या १२व्या षटकात पहिली विकेट घेतल्यानंतर त्याची चिंता कमी झाली आणि तो रिलॅक्स दिसत होता. वेंकटेशने पदार्पणाच्या सामन्यातच आपली छाप सोडली आहे. लोकांना त्याच्या क्रिकेट कौशल्याबद्दल माहिती आहे, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की तो एक प्रशिक्षित कर्नाटक संगीतकार देखील आहे. व्यंकटेश हा कर्नाटक संगीतकार आणि कलाकारांच्या कुटुंबातील आहेत. त्यांची आजी व्ही सरोजा या कर्नाटकातील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांची आई दक्षिणायिनी मुरलीधर या शास्त्रीय नृत्यांगना आहेत.

हेही वाचा: Team India: “उमरान किंवा सिराजचे अनुकरण करण्यापेक्षा…” नो-बॉल संदर्भात गौतमचा अर्शदीप सिंगला गंभीर सल्ला

वडिलांच्या सल्ल्याने संगीत सोडले आणि बॅट-बॉल हाती घेतला

व्यंकटेशचा धाकटा भाऊ योगेश्वर देखील एक प्रशिक्षित कर्नाटक संगीतकार आहे आणि कन्नड टीव्ही चॅनेलमध्ये स्वतःचे नाव कमवत आहे. त्याचे वडील मुरलीधर यांनी त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले आणि वेंकटेशने मैदानावर बॅट आणि बॉलने आपले पराक्रम दाखवण्यासाठी संगीत सोडले.

Story img Loader