Indian Players in Ranji Trophy 2025: रणजी ट्रॉफी २०२४-२५ सामन्यांना सुरुवात झाली आहे. २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक उत्साहपूर्ण आणि रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. याचं कारण म्हणजे भारताच्या राष्ट्रीय संघात खेळत असलेले खेळाडू या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार आहेत. विविध ठिकाणी आज रणजी ट्रॉफीचे १७ सामने खेळवले जात आहेत. या विविध सामन्यांमध्ये भारताचे खेळाडू सहभागी झाले आहेत. पाहूया कोण कोण आहेत हे खेळाडू…
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचे अनेक खेळाडू रणजी सामने खेळताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फेल ठरलेला रोहित शर्मा फॉर्म मिळवण्यासाठी तर यशस्वी जैस्वाल आपला फॉर्म कायम राखण्यासाठी खेळत आहेत. तर श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे हे खेळाडूही रणजी संघाचा नियमित भाग आहेत आणि भारतीय संघात आपले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी खेळताना दिसत आहेत. शार्दुल ठाकूरला दुखापतीनंतर पुन्हा भारताच्या संघात संधी मिळालेली नाही. तर शिवम दुबे संघात आपले स्थान कायम राखण्यासाठी खेळत आहे.
याशिवाय ऋषभ पंत, शुबमन गिलसारखे खेळाडू आपला फॉर्म सुधारण्यासाठी खेळत आहेत. याशिवाय देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, करूण नायर, हनुमा विहारी, इशान किशन, रमणदीप सिंग, ऋतुराज गायकवाड संघात पुन्हा एकदा आपले स्थान परत मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करत आहेत. पण रणजी सामन्यांच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत व शुबमन गिल हे खेळाडू फेल ठरले.
रणजी ट्रॉफीत खेळत असलेले भारतीय संघाचे खेळाडू
- इशान किशन (झारखंड)
- नवदीप सैनी
- ऋतुराज गायकवाड (महाराष्ट्र)
- कृणाल पंड्या (बडोदा)
- रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे (मुंबई)
- रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा (सौराष्ट्र)
- हनुमा विहारी, श्रीकर भरत (आंध्र)
- करुण नायर (विदर्भ)
- दीपक हुड्डा, खलील अहमद (राजस्थान)
- शुबमन गिल, रमणदीप सिंग (पंजाब)
- मयांक अगरवाल, देवदत्त पड्डीकल, प्रसिध कृष्णा (कर्नाटक)
- रजत पाटीदार, वेंकटेश अय्यर, आवेश खान (मध्य प्रदेश)
- विजय शंकर (तामिळनाडू)
- ऋषभ पंत (दिल्ली)
- आकाशदीप, मुकेश कुमार (बंगाल)
- युझवेंद्र चहल (हरियाणा)
- खलील अहमद (राजस्थान)