करोनामुळे गेल्या मोसमात न झालेली रणजी ट्रॉफी स्पर्धा यंदा पार पडत आहे. या स्पर्धेत दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात १९ वर्षांखालील वर्ल्डकप विजेता कर्णधार यश धुलने आपल्या रणजी कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. दिल्लीकडून खेळणाऱ्या यशने पदार्पणाच्या सामन्यातच तमिळनाडूविरुद्ध शतक झळकावले. त्याचवेळी अंडर-१९ संघाचा आणखी एक खेळाडू राज बावा पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यश धुल ९७ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला जीवदान मिळाले. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. धुलने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने १६ चौकारही ठोकले. यशने या शतकासह नवा विक्रम आपल्या नावावर केला आणि दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवले. रणजी स्पर्धेत पदार्पणात शतक ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अमोल मजुमदार यांचा समावेश आहे. आता यात यशचेही नाव घेतले जाईल.

हेही वाचा – IND vs WI : टीम इंडियानं सामना जिंकला, पण पोलार्डनं वाढवलं रोहितचं टेन्शन!

१९ वर्षीय यशला आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ५० लाख रुपयांना संघात घेतले आहे. यशने त्याची मूळ किंमत २० लाख रुपये ठेवली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव केला होता. यशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते, ज्याच्या जोरावर भारताने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.