ZIM vs AFG 2nd Test Highlights: रशीद खानने आपल्या फिरकीच्या जोरावर मोठमोठ्या खेळाडूंना नमवत संघाला दणदणीत विजय मिळवून दिले आहेत. आता त्याने हिच कामगिरी झिम्बाब्वेविरूद्धच्या कसोटी सामन्यात करत संघाच्या मालिका विजयात मोठी भूमिका बजावली आहे. रशीद खानने झिम्बाब्वेविरूद्धच्या कसोटी सामन्यात ११ विकेट घेत नवा विक्रम नावे केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे या संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात होती. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये वेगळाच रोमांच अनुभवायला मिळाला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात रशीद खानने ७ विकेट्स घेतल्या. मात्र, याआधीही रशीदने सुमारे तीन वर्षांपूर्वी हा पराक्रम केला होता. मात्र यावेळी त्याने खूपच कमी धावा दिल्या आहेत. याआधी २०२१ मध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात अबुधाबीमध्ये कसोटी सामना खेळला गेला होता, तेव्हा रशीद खानने १३७ धावा देत ७ विकेट्स घेतले होते.
रशीद खानने दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेविरूद्ध एका डावात ७ विकेट्स घेत फक्त ६६ धावा दिल्या. याआधीही अफगाणिस्तानच्या नावावर कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम होता, तो आजही त्यांच्या नावावर आहे. पण आता अफगाणिस्तानने हा विक्रम अधिक मजबूत केला आहे.
ग
आतापर्यंत अफगाणिस्तानने कसोटीत फक्त दोन वेळा एका डावात सात विकेट्स घेतल्या आहेत आणि रशीद खानने दोन्ही वेळा ही कामगिरी केली आहे. याशिवाय रशीद खानने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध ४९ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. २०२१ मध्ये अफगाणिस्तानच्या आमीर हमलाने झिम्बाब्वेविरुद्ध ७५ धावांत ६ विकेट घेतले होते. रशीद खानने कसोटीत केवळ ५५ धावा देत ५ विकेट घेण्याचा विक्रमही केला आहे. त्याने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती.
अफगाणिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केवळ १५७ धावा केल्या. यानंतर झिम्बाब्वेने प्रत्युत्तरात २४३ धावा नोंदवल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर आघाडी घेतली. पण अफगाणिस्तानच्या रहमत शाहने १३९ धावांची आणि इस्मात अलाम यामे १०१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ३६३ वर नेऊन ठेवली. यानंतर रशीद खानच्या जादुई गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेवर कसोटीत मालिका विजय मिळवला.