अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान जबदस्त फॉर्ममध्ये आहे. राशिद सध्या दक्षिण आफ्रिकन टी-२० लीगमध्ये खेळत आहे.जिथे त्याने सोमवारी इतिहास रचताना आपल्या शानदार गोलंदाजीने अनेक दिग्गजांना मागे सोडले. त्याने प्रिटोरियस कॅपिटल्सविरुद्ध ३ विकेट्स घेत राशिद टी-२० मध्ये ५०० विकेट्सचा टप्पा गाठणारा जगातील सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याच्याशिवाय वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ५०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत, मात्र राशिदने वयाच्या २४ व्या वर्षी हा पराक्रम केला.

५०० विकेट्स घेणारा एकमेव फिरकी गोलंदाज –

राशिद खान वर्षभर वेगवेगळ्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळतो. या सर्व ठिकाणी तो विकेट घेत राहतो. यामुळे त्याच्या ५०० विकेट पूर्ण झाल्या असून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये असे करणे आश्चर्यापेक्षा कमी नाही. ५०० टी-२० विकेट घेणारा राशिद जगातील पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, जर आपण टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍यांच्या यादीवर नजर टाकली तर, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो ६१४ बळींसह अव्वल स्थानावर आहे.

दुसरीकडे, राशिद खान आहे, ज्याने ३७१ व्या सामन्यात ५०० बळींचा विक्रम केला. त्याच्याशिवाय सुनील नरेन (४७४), इम्रान ताहिर (४६६) आणि शाकिब अल हसन (४३६) या यादीत आहेत. यासह ५०० टी-२० विकेट घेणारा राशिद जगातील पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. यासह राशिद खानने शाकिब अल हसन, सुनील नरेन यांसारख्या दिग्गज फिरकीपटूंना मागे टाकले असून अशी कामगिरी करणारा तो पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: रोहित शर्मा गौतम गंभीरशी बरोबरी करणार? १३ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची असणार संधी

टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –

१.ड्वेन ब्राव्हो – ६१४
२.राशिद खान – ५००
३.सुनील नरेन – ४७४
४.इम्रान ताहिर – ४६६
५.शाकिब अल हसन – ४३६

राशिद खानची टी-२० कारकीर्द –

राशिद खानने ३६८ डावांमध्ये १८.१० च्या सरासरीने आणि ६.३०च्या इकॉनॉमीने ५०० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १७ होता. राशिदने त्याच्या टी-२० कारकिर्दीत ९ वेळा चार किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत, तर ४ वेळा ५ बळी घेतले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashid khan became the second bowler and first spinner to take 500 wickets in t20 league cricket vbm