अफगाणिस्तानचा सर्वाेत्कृष्ट लेगस्पिनर रशीद खानने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. रशीद खानने टी-२० क्रिकेटमध्ये ‘विश्वविक्रम’ आपल्या नावे केला आहे. रशीद खान आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशीद खानने टी-२० क्रिकेटमध्ये ६३३ विकेट घेत इतिहासाच्या सुवर्ण पानांवर आपले नाव नोंदवले आहे. रशीद खानने वेस्ट इंडिजचा माजी स्टार क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होचा विक्रम मागे टाकला आहे. ड्वेन ब्राव्होने ५८२ सामन्यात ६३१ विकेट घेतल्या होत्या. मंगळवारी पार्ल रॉयल्स विरुद्ध SA20 २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रशीद खानने २ विकेट घेत इतिहास लिहिला. रशीद खानने ४६१ सामन्यात ६३३ विकेट घेतल्या आहेत.

२०१५ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रशीद खानने आतापर्यंत ४६१ सामने खेळून एकूण ६३२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विकेट्सचा समावेश आहे. या टी-२० क्रिकेटमध्ये रशीद खानची आतापर्यंतची सरासरी १८च्या आसपास आहे आणि तो साडेसहा च्या इकॉनॉमीमध्ये विकेट चटकावतो. ड्वेन ब्राव्होने २००६ मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने ५८२ सामने खेळून ६३१ घेतले आहेत. तो बराच काळ पहिल्या क्रमांकावर होता, पण आता रशीद खानने त्याला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

१. रशीद खान (अफगाणिस्तान) – ६३३ विकेट्स

२. ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) – ६३१ विकेट्स

३. सुनील नरेन (वेस्ट इंडिज) – ५७४ विकेट्स

४. इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – ५३१ विकेट्स

५. शकीब अल हसन (बांगलादेश) – ४९२ विकेट्स

रशीद खानने वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय फिरकीपटू रशीद खानच्या नावावर देशांतर्गत टी-२० आणि फ्रँचायझी टी-२० टूर्नामेंटमध्ये ४७२ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. रशीद खान ॲडलेड स्ट्रायकर्स, बँड-ए-आमिर ड्रॅगन्स, बार्बाडोस ट्रायडेंट्स, कोमिला व्हिक्टोरियन्स, डर्बन हीट, गुजरात टायटन्स, गयाना ॲमेझॉन वॉरियर्स, काबुल जवानान, लाहोर कलंदर्स, एमआय केप टाऊन, एमआय न्यूयॉर्क, स्पीन घर टायगर्स, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स, सनरायझर्स हैदराबाद, ससेक्स, ट्रेंट रॉकेट्ससाठी फ्रँचायझी क्रिकेट खेळला आहे.