अफगाणिस्तानचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज राशिद खान ‘पुष्पा‘ या भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉगवर व्हिडिओ पोस्ट करून इतर अनेक सहकारी क्रिकेटपटूंसह ट्रेंडमध्ये सामील झाला. सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राइज’ चित्रपट सध्या जोरात सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक क्रिकेटपटूंनी या चित्रपटातील डायलॉग आणि श्रीवल्ली या गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. आता या यादीत राशिद खानचे नावही जोडले गेले आहे. ”पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या, फायर है मैं झुकूँगा नहीं”, हा डॉयलॉग बोलताना राशिद व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना राशिद खानने कॅप्शनमध्ये लिहिले, ”आता माझी वेळ आली आहे.” ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने राशिदच्या व्हिडिओवर कमेंट करत ”माझी कॉपी करू नका”, असे लिहिले आहे. वॉर्नरने आपल्या इंस्टाग्रामवर पुष्पा चित्रपटासंबंधी अनेक व्हिडिओ शेअर केल्या आहेत.
हेही वाचा – विकेट घेताच ड्वेन ब्रावोने ‘पुष्पा’ स्टाईलने केला डान्स, सेलिब्रेशनचा Video Viral
टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैना, अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्या, वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो यांनीही पुष्पा या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स केला होता. या सर्वांचे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा’ चित्रपटाची हवा गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत आहे. गाणी, डायलॉग आणि जबरदस्त लूकच्या बाबतीत ‘पुष्पा’ने चाहत्यांची मने जिंकली. अगदी बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर ‘पुष्पा’ फिवर चढलेला दिसून येत आहे.