इंग्लंड महिला संघाची स्टार फलंदाज डॅनियल वॅट ही अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानच्या हेलिकॉप्टर शॉटची चाहती बनली आहे. मोठ्या फलंदाजांना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून राशिद खानने आपली हवा निर्माण केली. आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या राशिदने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

खास गोष्ट अशी, की राशिद खानने हा शॉट बॅटने नव्हे, तर गोल्फ स्टिकने खेळला आहे. राशिदने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली. “तुम्ही कधी गोल्फद्वारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे का?”, असे राशिदने आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

हेही वाचा – मोहम्मद अझरुद्दीनला पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद

इंग्लंडचा माजी स्फोटक फलंदाज केविन पीटरसननेही राशिद खानच्या या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली. त्याने राशिदला पुढच्या वेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न कर, असे म्हटले आहे. पीटरसन स्विच हिट खेळण्यात मातब्बर होता. इंग्लंड महिला संघाची स्टार फलंदाज डॅनियल वॅटसुद्धा या व्हिडिओवर भाष्य करण्यापासून स्वत: ला रोखू शकली नाही. तिने हसणारा इमोजी शेअर केला आहे.

डॅनियल वॅटने २०१४मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय कर्णधार विराट कोहलीला लग्नासाठीही प्रपोज केले होते. २०१०मध्ये भारत दौर्‍यादरम्यान तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Story img Loader