नुकत्याच झालेल्या टी-10 लीगमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खानने हेलिकॉप्टर शॉट खेळत सगळ्यांची वाहवा मिळवली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट प्रसिद्ध करण्यात महेंद्रसिंह धोनीचा मोठा वाटा आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळताना राशिद खानने पुन्हा एकदा या हेलिकॉप्टर शॉटची पुनरावृत्ती करुन दाखवली आहे. डरबन हिट संघाकडून खेळत असताना 17 व्या षटकात राशिद खानने हा फटका खेळत षटकार ठोकला.
@MSL_T20 @durban_heat pic.twitter.com/0yfE6NnQWt
— Rashid Khan (@rashidkhan_19) December 13, 2018
डरबन हिट संघाने आपल्याला विजयासाठी दिलेलं 189 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. या सामन्यात राशिद खानने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपलं भरीव योगदान दिलं. त्याचा हा हेलिकॉप्टर शॉट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागल्यानंतर सनराईजर्स हैजराबाद आणि टॉम मूडी यांनीही त्याच्या फटक्याचं कौतुक केलं आहे.
After the @T10League, @rashidkhan_19 pulled out the helicopter shot yet again in last night’s @MSL_T20 clash against Tshwane Spartans @durban_heat @ChennaiIPL @msdhoni https://t.co/tabMVzWvmT
— SunRisers Hyderabad (@SunRisers) December 13, 2018
Oh not again…we have lift off #helicopter https://t.co/iEdZMN82a1
— Tom Moody (@TomMoodyCricket) December 13, 2018