आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. फिरकीचा जादूगार अशी ओळख असलेल्या शेन वॉर्नने १४५ कसोटीत ७०८ तर १९४ वन-डे सामन्यांमध्ये २९३ बळी घेतले आहेत. मात्र एवढी मोठी कामगिरी करुनही अफगाणिस्तानचा नवोदीत फिरकीपटू राशिद खानला शेन वॉर्न आवडत नाही. यासाठी राशिद खानकडे ठोस कारणही आहे. सेलिब्रेटी अँकर गौरव कपूर याच्या ‘ब्रेकफास्ट विथ चँपियन’ या कार्यक्रमात राशिद खानने हा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेन वॉर्न हा हळु गोलंदाजी करत असल्याने मी तरुण असताना तो मला फारसा आवडायचा नाही. त्यातुलनेत अनिल कुंबळे आणि शाहिद आफ्रिदी हे दोन्ही गोलंदाज मला अधिक जवळचे वाटायचे. त्यांच्या गोलंदाजीत वेग होता. याच कारणासाठी मला त्यांची गोलंदाजी अधिक आवडायची. टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची चमक दाखवल्यानंतर राशिद खान अफगाणिस्तानकडून भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. मात्र या सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.