Rashid Latif criticizes PCB: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, मात्र यानंतर बोर्डाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध जाहीर केलेल्या संघातून कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानसारखे काही स्टार खेळाडू वगळले आहेत.

हे सर्व खेळाडू अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाहीत. आता या स्टार खेळाडूंना विश्रांती दिल्याने क्रिकेट चाहते आणि पाकिस्तानचे अनेक माजी क्रिकेटपटू पीसीबीवर जोरदार टीका करत आहेत. या खेळाडूंना विश्रांती देण्याचे कारण म्हणजे हे सर्वजण सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहेत.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राशिद लतीफ यानेही बोर्डाच्या निर्णयावर आक्षेप व्यक्त करत टीकाही केली. जेव्हा आमचे खेळाडू आयसीसी क्रमवारीत सामील होऊ लागले आहेत. तसेच पुरस्कार जिंकू लागले आहेत, तेव्हा असे पाऊल समर्थनीय नाही, असे त्यांचे मत आहे. ते म्हणाले की, पीसीबीच्या शीर्षस्थानी असलेले ७०-८० वर्षे वयोगटातील लोक हे ठरवत आहेत की कोणी विश्रांती घ्यावी की नाही.

हेही वाचा – IND vs AUS ODI: मैदानात नव्हे तर मुंबईच्या गल्ली क्रिकेटमध्ये रमला डेव्हिड वॉर्नर, VIDEO होतोय व्हायरल

पाकिस्तानचा राष्ट्रीय संघ उद्ध्वस्त करण्याची ही पहिली पायरी आहे का? पाकिस्तान क्रिकेटशी बोलताना रशीद लतीफ म्हणाले की, आमचे खेळाडू आयसीसी क्रमवारीत स्थान मिळवत आहेत आणि बऱ्याच काळानंतर पुरस्कार जिंकत आहेत. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांनी आयसीसी पुरस्कार जिंकले आणि पीसीबीला ते पचवता आले नाही.

आम्ही हे होऊ देणार नाही आणि आता आम्ही येथे आहोत आणि निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही आणि ७० किंवा ८० वर्षांचे आहेत आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे. ते आता पाकिस्तान क्रिकेटचे भवितव्य ठरवत आहेत. तुम्ही रेस्ट इन पीस पाकिस्तान क्रिकेट टीम म्हणू शकता. लतीफ म्हणाले की, जेव्हा तुम्ही नवीन खेळाडू आणता तेव्हा तुम्ही संघाचे संयोजन मोडता.

निवडलेले काही नवीन खेळाडू अफगाणिस्तान मालिकेत कामगिरी करतील, त्यामुळे ते कमी स्ट्राइक रेट असलेल्या वरिष्ठ खेळाडूंना परत आणतील. प्रसारमाध्यमेही त्याच्यावर दबाव आणतील, पाकिस्तान संघाला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. दोन्ही देशांदरम्यान २५ मार्चपासून शारजाहमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

हेही वाचा – IPL 2023 मध्ये ऋषभ पंतची जागा कोण घेणार, सरफराज खान विकेटकीपिंग करणार का? यावर मोहम्मद कैफचा मोठा खुलासा

अफगाणिस्तान दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ –

शादाब खान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सैम अयुब, शान मसूद, तय्यब ताहिर, जमान खान.
राखीव खेळाडू: अबरार अहमद, हसिबुल्लाह आणि उसामा मीर.