रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा जम्मू आणि काश्मिर संघातील होतकरू अष्टपैलू परवेझ रासोलचा भारतीय ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या संघात अक्षय दरेकर आणि केदार जाधव हे मराठमोळे चेहरेही आहेत. ६ जानेवारीला इंग्लंडविरुद्ध भारतीय ‘अ’ संघ सराव सामना खेळणार आहे.
रासोलने यंदाच्या मोसमात ५९४ धावा आणि ३३ बळी मिळवले होते. जम्मू आणि काश्मिर संघातून भारतीय ‘अ’ संघात निवडलेला रासोल हा पहिला खेळाडू आहे. जम्मू आणि काश्मीर संघाचे प्रशिक्षक बिशन सिंग बेदी यांचा आपल्या यशात मोलाचा वाटा आहे, असे रासोलने सांगितले.
दुखापतीमुळे गेले वर्षभर क्रिकेटला मुकलेला केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याने संघात पुनरागमन केले आहे. तामिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारणाऱ्या संघांमधील एकाही खेळाडूने या संघात स्थान मिळवले नाही.
भारतीय ‘अ’संघ : अभिनव मुकंद (कर्णधार), मुरली विजय, रॉबिन बिश्त, केदार जाधव, अशोक मनेरिया, रोहित मोटवानी (यष्टिरक्षक), जलाज सक्सेना, अक्षय दरेकर, ईष्टद्धr(२२४)वर पांडे, एस. श्रीशांत, ऋषी धवन, पारस डोगरा, मोहित शर्मा आणि रासोल परवेझ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा