Ravi Bishnoi has decided to play for Gujarat instead of Rajasthan in domestic cricket: रवी बिश्नोई हा भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख लेगस्पिन गोलंदाज म्हणून गणला जातो. आता या लेगस्पिनर रवी बिश्नोईने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत रवी बिश्नोई देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान संघासोबत खेळताना दिसत होता. आता तो आगामी देशांतर्गत हंगामात गुजरात संघाकडून खेळताना दिसणार आहे. २२ वर्षीय रवी बिश्नोईने सोशल मीडियावर संघाच्या जर्सीसोबतचा फोटो पोस्ट करून गुजरात संघासोबत खेळण्याची माहिती दिली. रवी बिश्नोईला गेल्या वर्षीच भारतीय संघासाठी वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवी बिश्नोईचा गुजरातकडून खेळण्याचा निर्णय सर्वांसाठी निश्चितच धक्कादायक आहे. गेल्या रणजी मोसमात राजस्थानकडून पदार्पण करणाऱ्या बिश्नोईला केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याला दोन विकेट घेण्यात यश आले. यानंतर पुढच्या चार सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

वृत्तानुसार, भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रवी बिश्नोईने राजस्थान संघाकडून कमी संधी मिळाल्याने गुजरातकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या मोसमात रवी बिश्नोईला संधी न देण्याच्या राजस्थान संघाच्या निर्णयावरही बरीच टीका झाली होती. पंरतु बिश्नोईला विजय हजार ट्रॉफीचे सर्व सात सामने खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यात त्याने २५.०९ च्या सरासरीने ११ विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2023: नाद करा पण सीएसकेचा कुठं! आयपीएल ट्रॉफीबरोबरच आता ‘या’ बाबतीतही मारली बाजी

रवी बिश्नोईची आतापर्यंतची कारकीर्द –

रवी बिश्नोई हा भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख लेगस्पिन गोलंदाज म्हणून गणला जातो. बिश्नोईने गेल्या वर्षीच भारतीय संघासाठी टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत खेळलेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये बिश्नोईने १७.१२ च्या सरासरीने १६ विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी त्याला एका वनडेत फक्त एक विकेट घेता आली. याशिवाय बिश्नोईने आतापर्यंत ५२ आयपीएल सामन्यांमध्ये ५३ विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi bishnoi has decided to play for gujarat instead of rajasthan in domestic cricket vbm
Show comments