IND vs SL 1st T20I Highlights: श्रीलंका आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाच्या सर्वच खेळा़डूंनी भारताच्या या विजयात मोठे योगदान दिले आहे. भारताने दिलेल्या २१४ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा फिरकीपटू रवी बिश्नोईसोबत मैदानात अपघात झाला. चेंडू त्याच्या डोळ्याच्या अगदी खाली लागला आणि तो जखमी झाला. त्याच्या डोळ्याखाली चेंडू इतक्या जोरात आदळला की रक्त येत होतं. पण त्याला ही दुखापत कधी आणि कशी झाली? जाणून घ्या.

हेही वाचा – अखेरच्या षटकात रियान परागचे सलग दोन विकेट अन् श्रीलंका ऑल आऊट, गंभीर-सूर्याची विजयी सलामी

Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
ENG vs SL Joe Root sixth highest run scorer in Test cricket
ENG vs SL Test : जो रुटने कुमार संगकाराला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील सहावा खेळाडू
Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…
Joe root make most test runs at lords cricket ground
Joe root : जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! सर्व फलंदाजांना मागे टाकत लॉर्ड्सवर केली खास कामगिरी
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक

IND vs SL: रवी बिश्नोईला कसा लागला चेंडू?

रवी बिश्नोई श्रीलंकेच्या डावातील १६वे षटक टाकण्यासाठी आला होता. श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. बिश्नोईने गुगली बॉल टाकला ज्यावर त्याच्या बॅटची पुढची कड घेत चेंडू बिश्नोईच्या उजव्या दिशेन परत येत होता. त्यामुळे बिष्णोई हा झेल टिपण्याचा प्रयत्न करत एक डाईव्ह केली. बिश्नोईने असे अनेक झेल टिपले आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्याअफलातून झेलचे व्हीडिओही आपण पाहिले आहेत. त्यामुळे हा झेल टिपणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं.

हेही वाचा – IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचे सामने लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या योग्य चॅनेल व मोबाईल अ‍ॅप

बिश्नोईने तो चेंडू पकडण्यासाठी डाईव्ह मारली आणि चेंडूही त्याने पकडला. पण एका हाताने झेल पकडता आला नाही. डाइव्ह केल्यानंतर रवी जमिनीवर पडला आणि त्याचा हात जमिनीवर आदळल्याने चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू येऊन थेट त्याच्या डाव्या डोळ्याखाली आदळला. चेंडू त्याच्या डोळ्याखाली इतक्या जोरात आदळला की त्याला जखम झाली आणि रक्तही येऊ लागलं, मात्र त्यानंतर फिजिओ मैदानात आला आणि त्यांनी तपासून त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. एवढी जखम झालेली असतानाही बिश्नोई मैदानाबाहेर न जाता त्याने गोलंदाजी सुरू ठेवली आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने थेट श्रीलंकेचा कर्णधार चरित असलंकाची विकेट घेतली.

हेही वाचा – Paris Olympics 2024: ऑलिम्पिक नगरीत ३ लाखांहून अधिक कॉन्डोमचं वाटप, काय आहे यामागचं कारण

पहिल्याच टी-२०मध्ये भारताची विजयी सलामी
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या मोबदल्यात २१३ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ५८ धावांची तुफानी खेळी केली. २१४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १९.२ षटकांत १७० धावांत ऑलआऊट झाला आणि ४३ धावांनी सामना गमावला. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांचा हा भारताचा पहिला T20 विजय होता. टीम इंडियाने आता ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.