चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर झाला असून, अष्टपैलू खेळाडू रवी बोपाराने संघात पुनरागमन केले आहे. ग्रॅमी स्वॉन आणि टीम ब्रेसनन दुखापतीतून सावरल्याने १५ सदस्यीय संघात त्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सलाही संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर खराब फॉर्ममुळे बोपाराला संघातून डच्चू देण्यात आला होता. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी इंग्लंड लायन्स संघाचे नेतृत्व बोपाराकडे सोपवण्यात आले होते. इंग्लंडचा संघ : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, इयान बेल, रवी बोपारा, टीम ब्रेसनन, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, ईऑन मॉर्गन, जो रूट, ग्रॅमी स्वॉन, जेम्स ट्रेडवेल, जोनाथन ट्रॉट, ख्रिस वोक्स.

Story img Loader