आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवि शास्त्री कॉमेंट्री करत होता.तो म्हणाला ‘टॉस च्या आधी ग्राउंड वर खेळाडू सराव करत होते.मी सेहवागला विचारले विकेट कैसी है वीरु?तेव्हा तो चटकन म्हणाला ,रवि भाई मुझे क्या फर्क पड़ता है,मेरा खेलनेका एकही तरिका है.’
हाच तो सेहवागी’बाणा.बेदरकार,बिनधास्त,बेधडक.जो होगा सो होगा.

हाच बाणा ठेऊन त्याने ३८ आंतरराष्ट्रीय सेंचूर्या ठोकल्या. २३ सेंचूर्या कसोटीत आणि १५ वन डे मध्ये. म्हणजे हा बाणा त्याला ‘लाभला’ असं म्हणलं पाहिजे.१०४ कसोटीत ४९ ची सरासरी आणि २५१ वन डे मध्ये १०४ चा स्ट्राइक रेट म्हणजे नक्कीच हां स्पेशल टॅलेन्ट होता. कसोटीत सुद्धा जो ८२ च्या स्ट्राइक रेट सातत्याने  बदडतो तो मोठाच खेळाडू.

मला त्याची वन डे मधली कोलंबोला न्यूज़ीलैंड विरुद्ध केलेली पहिली सेंचूरि आठवतीये. ७० चेंडूत शंभर केला त्याने.त्या सामन्यात सचिन नव्हता.सेहवाग ने ऑफ साइडला ऑन द राइज़ मारलेले फटके पाहून सचिन रोमांचित झाला. त्याने त्याचे खास मेसेज देऊन अभिनंदन केले. ज्या शैलीचि सचिनने उपासना केली ती तो सेहवाग मध्ये पहात होता.त्या दिवशी सगळ्या भारताला वाटलं आपल्याला अजून एक सचिन मिळाला. शॉट खेळताना डोकं स्थिर ठेऊन हैण्ड आय कॉर्डिनेशन ने त्याने एकसो एक फटके भात्यातून काढले. पायाची हालचाल कमीत कमी करून किंचित इनसाइड आउट खेळण्याची त्याची पद्धत होती. तरी देखील त्याची बैट वेळेवर चेंडू वर यायची हे विशेष. या नैसर्गिक देणगीवर त्याचा गाढ़ा विश्वास होता आणि म्हणूनच त्याने त्याचा ‘सेहवागी’ बाणा कधीही बदलला नाही. त्याच्या या दृष्टिकोनाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याने स्वत:च्या विकेटचा कधीही प्रेस्टीज इशू केला नाही. स्वत: च्या विकेट ला त्याने त्याचा ईगो चिकटवला नाही. एखाद्या गोलंदाजाला विकेट द्यायची नाही वगैरे खुन्नस डोक्यात ठेऊन कधीच खडूस फलंदाजी केली नाही. कुठलीही आकडेवारी, मान सन्मान वगैरे डोक्यात न ठेवता फक्त दोन हाती बड़वण्याचे काम केले. त्याच्या या दृष्टिकोनामुळे त्याच्या चाहत्यांनी सुद्धा त्याला कधीही देव्हार्यात बसवले नाही. त्यामुळे त्याला मनस्वी फलंदाजी करता आली. सेहवाग बेफिकरिने आउट झाला तरी चाहते ते स्वीकारून त्याच्या आधीच्या वादळी इनिंग मध्ये रमायचे. त्याचे वेगळेपण ओळखून कर्णधारांनी, निवडसमीतीने, बीसीसीआय ने , जुन्या खेळाडूनीं त्याला पुरेपूर पाठिंबा दिला.

याच “सेहवागी’बाण्याची खर्चाची बाजू(डेबिट साईड) म्हणजे नियमित येणारा आणि बरेच सामने चालणारा धावांचा दुष्काळ. दहा दहा सामने अर्धशतकाशिवाय जाऊ लागले. हैण्ड आय कॉर्डिनेशन ची मात्रा चालेनाशी झाल्यावर तंत्रातील त्रूटिंची चर्चा होणे स्वाभाविक होते. पाय न हलवता मूविंग बॉल ला प्रत्येक इनिंग ला धावा करणे किंवा कठीण परिस्थितीचा सामना करणे अवघडच असते. त्यामुळे ‘सेहवागी’ बाण्याचा संघाला फटका बसू लागला. कोच जॉन राईट ने त्याची गचांडी धरल्याच्या सुद्धा बातम्या आल्या. धोनी ने ‘इतिहास हा इतिहास.वर्त्तमान हे वर्त्तमान’ हे सूत्र आणले (ज्याने भारतीय क्रिकेट पुढे गेले)आणि अनेक खेळाडूं सारखे सेहवागला सुद्धा बाहेर जावे लागले.
कमीत कमी तंत्राची शैली असली की त्या फलंदाजाची एक्सपायरी डेट तुलनात्मक रित्या लवकरची असते.तरी पण १०४ कसोटी आणि २५१ वन डे खेळणाऱ्या सेहवागचे करियर दूर आणि वैभव संपन्न गेले.त्याच्या बरोबरच त्याला सपोर्ट करणाऱ्या बीसीसीआय चे अभिनंदन.
‘सेहवागी’ बाण्याने डोळ्याचे पारणे फेडणारा आनंद दिला आणि अनेक विजयाचा आनंद ही.
ऑल द बेस्ट सेहवाग!

– रवि पत्की
sachoten@hotmail.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi patkis blog on virender sehwag