इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत लाजीरवाणा पराभव स्वीकारणाऱया भारतीय संघात आता पुढील एकदिवसीय मालिकेसाठी बदल करण्यात आले आहेत.
माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडसमोर कसोटी मालिकेत ३-१ अशी शरणागती पत्करल्यानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी टीकास्त्र होत आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वशैलीवर सुद्धा प्रश्न निर्माण केले जात आहेत. संघाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आता एकदिवसीय मालिकेसाठीच्या टीम इंडियाच्या सहाय्यक संघात बदल करण्यात आला आहे. या सहाय्यक संघात आता डी.फ्लेचर, जे.डेव्हज, टी.पेन्नी, रवी शास्त्री, एस.बांगर, बी.अरूण आणि आर.श्रीधर यांचा समावेश आहे. यामध्ये रवी शास्त्री संघाच्या संचालकपदाची धुरा सांभाळणार आहेत.

Story img Loader