इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत लाजीरवाणा पराभव स्वीकारणाऱया भारतीय संघात आता पुढील एकदिवसीय मालिकेसाठी बदल करण्यात आले आहेत.
माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडसमोर कसोटी मालिकेत ३-१ अशी शरणागती पत्करल्यानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी टीकास्त्र होत आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वशैलीवर सुद्धा प्रश्न निर्माण केले जात आहेत. संघाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आता एकदिवसीय मालिकेसाठीच्या टीम इंडियाच्या सहाय्यक संघात बदल करण्यात आला आहे. या सहाय्यक संघात आता डी.फ्लेचर, जे.डेव्हज, टी.पेन्नी, रवी शास्त्री, एस.बांगर, बी.अरूण आणि आर.श्रीधर यांचा समावेश आहे. यामध्ये रवी शास्त्री संघाच्या संचालकपदाची धुरा सांभाळणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा