Ravi Shastri’s Suggestion to ICC: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीसमोर एक कल्पना मांडली आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटचा दर्जा कायम राखण्यासाठी त्यांनी संघांची संख्या सहा किंवा सातवर आणावी असे सांगितले आहे. या फॉरमॅटमध्ये अटीतटीचे सामने व्हायला हवे आणि त्यासाठी फक्त बलाढ्य संघ खेळायला हवेत, असे शास्त्रींचे म्हणणे आहे. त्यांनी अव्वल सात संघांसाठी स्वतंत्र श्रेणी तयार करण्याची कल्पना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

लंडनमधील वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स इव्हेंटमध्ये कसोटी क्रिकेटच्या भवितव्यावर बोलताना शास्त्री म्हणाले की, “मजबूत संघांमधील सामन्यांद्वारेच कसोटी फॉरमॅटची आवड टिकवून ठेवता येईल. ते म्हणाले,, दर्जा नसेल तर रेटिंग घसरते, प्रेक्षक कमी येतात, तेव्हा असं क्रिकेट खेळण्याला काहीच अर्थ नाहीय. तुमच्याकडे १२ कसोटी खेळणारे संघ आहेत. ते सहा किंवा सातपर्यंत कमी करा आणि प्रमोशन आणि रिलेगेशन सिस्टम सुरू करा. तुम्ही दोन गट तयार करू शकता, परंतु पहिल्या सहा संघांना खेळू द्या जेणेकरून चुरशीची लढत होईल आणि कसोटी क्रिकेट पाहण्यातील रस कायम राहील. तुम्ही टी-२० प्रमाणेच इतरही फॉरमॅट्सचा विस्तारही करू शकता.”

हेही वाचा – VIDEO: अभिषेक शर्माने पहिल्या शतकानंतर युवराज सिंगला केला व्हीडिओ कॉल; सिक्सर किंग पाहा काय म्हणाला?

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले की, “मला टी-२० लीग आवडतात पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर त्याचा परिणाम होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज संघाचा युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाचे उदाहरण दिले आणि सांगितले की, याने ऑस्ट्रेलियाला धक्का देत कॅरेबियन देशाला नवे चैतन्य मिळवून दिले. गेल्या आठवड्यात भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्याचे सेलिब्रेशन पाहण्यासाठी लाखो लोक आले होते. हेच द्विपक्षीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे.”

एमसीसीचे अध्यक्ष मार्क निकोलस म्हणाले की, “टी-२० क्रिकेट प्रत्येकाला हवेसे आहे. हीच गोष्ट नवीन बाजारपेठा खुल्या करत आहे. जिथे चाहते आणि पैसा दोन्ही आहे. क्रिकेटमध्ये पैशाकडे चुकीच्या नजरेने पाहिले जाते पण तसं नाही झालं पाहिजे कारण पैशांमुळेच हा खेळ कायम आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri gave suggestion to icc how to promote test cricket said play with only six teams bdg