आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदी भारतीय क्रिकेट प्रशासक एन. श्रीनिवासन यांची केलेली निवड योग्यच आहे, अशा शब्दांत भारताचे माजी क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्ष पदावरून त्यांना दूर केले असले, तरी अद्याप याबाबत मत व्यक्त करणे चुकीचे होईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी श्रीनिवासन यांना आयसीसीवर काम करण्यास कोणताही कायदेशीर अडसर नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे विनाकारण श्रीनिवासन यांच्यावर टीका करणे योग्य ठरणार नाही,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

Story img Loader