Ravi Shastri on ODI Cricket:भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सात महिन्यांहून कमी कालावधी उरला आहे. अशात भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की, आयसीसी स्पर्धेच्या भविष्यातील स्पर्धा ४०-४०षटकांच्या फॉर्मेटमध्ये बदलणे आवश्यक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रवी शास्त्री म्हणाले, “एकदिवसीय क्रिकेटच्या अस्तित्वासाठी भविष्यात सामने ४०-४० षटकांचे केले पाहिजे.”
१९८७ मध्ये ५० षटकांच्या वनडे क्रिकेटला सुरुवात –
शास्त्री म्हणाले की, एकदिवसीय सामन्यांतील घटत्या प्रेक्षकसंख्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९८३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तेव्हा ही स्पर्धा ६० षटकांची असायची, पण नंतर ती ५० षटकापर्यंत करण्यात आली.
एकदिवसीय सामन्यात दोन ब्रेक भारताला शक्य नव्हते –
शास्त्री म्हणाले, “मी हे म्हणतोय कारण १९८३ मध्ये जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकलो, तेव्हा ते ६० षटकांचा सामना असायचा. त्यानंतर लोकांचे त्याकडे असलेले आकर्षण कमी झाले. मग ते ५० षटकांचे झाले. मला वाटते की आता ४०-४० षटकांची वेळ आली आहे. काळानुरूप बदल होणे गरजेचे आहे, फॉरमॅट कमी षटकांचा व्हायला हवा.”
प्रेक्षकांच्या रुचीबद्दल शास्त्रींचे म्हणणे योग्य आहे, पण १९८७ मध्ये उपखंडात विश्वचषक झाला, तेव्हा १२० षटकांदरम्यान दोन ब्रेक (दुपारचे जेवण आणि चहा) घेणे शक्य नव्हते. कार इंग्लंडमध्ये आधीच्या तीन टप्प्यांमध्ये असे घडले होते.
टी-२० फॉरमॅट खेळात मोठी कमाई करत राहील –
शास्त्री पुढे म्हणाले की, टी-२० फॉरमॅट खेळात मोठी कमाई करत राहील, परंतु ते द्विपक्षीय टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेला अनुकूल नाहीत आणि म्हणतात की ते कमी केले पाहिजेत. दिग्गज क्रिकेटपटू द्विपक्षीय मालिका कमी करण्याचा सल्ला देत आहेत. ते म्हणाले, ‘मला वाटते टी-२० फॉरमॅट महत्त्वाचा आहे. त्याचा विकास होणे आवश्यक आहे. पण मला वाटतं द्विपक्षीय मालिका कमी व्हायला हव्यात.’
कसोटी क्रिकेट कायम राहील –
या माजी खेळाडूने सांगितले की, कसोटी क्रिकेट हे सर्वात महत्त्वाचे फॉर्मेट असल्याने त्याचे अव्वल स्थान कायम राहील. ते म्हणाले, ‘कसोटी क्रिकेट नेहमीच कसोटी क्रिकेट राहील आणि त्याला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. माझ्या मते भारतात सर्व फॉरमॅटसाठी जागा आहे. विशेषतः उपखंडात. विशेषतः ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी.’
हेही वाचा – IND vs AUS 4th Test: … म्हणून विराट कोहलीने शुबमन गिलचा पिरगळला हात, VIDEO होतोय व्हायरल
एकदिवसीय फॉर्मेटने त्याचे आकर्षण गमावले –
भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनेही सांगितले की, एकदिवसीय फॉर्मेट त्याचे आकर्षण गमावत आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारा विश्वचषक ही शेवटची आवृत्ती असू शकते. कार्तिक म्हणाला, ‘वनडे फॉरमॅटने त्याचे आकर्षण गमावले आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात किंवा वर्षभरानंतर आपण आणखी एक विश्वचषक पाहू शकतो. लोकांना कसोटी क्रिकेट बघायचे आहे, जे क्रिकेटचे खरे स्वरूप आहे आणि टी-२० हे मनोरंजनासाठी आहे.’