Ravi Shastri has raised questions about the mindset of the Indian team: लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांनंतर ३ बाद ३२७ धावा केल्या आहेत. अशात माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले.

रवी शास्त्रीच्या म्हणण्यानुसार, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन कर्णधार रोहित शर्माने आपली मानसिकता सकारात्मक नसल्याचे दाखवून दिले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात दमदार झाली आहे. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सत्रांमध्ये वर्चस्व राखले आणि अंतिम सत्रात एकही विकेट न गमावता १५७ धावा जोडल्या.

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघाचा मानसिकता योग्य नव्हती – रवी शास्त्री

ढगाळ वातावरण पाहून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला नाही. रवी शास्त्रींच्या मते, भारतीय संघाची मानसिकता सकारात्मक नव्हती.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्मा संतापला; लाइव्ह सामन्यात केली शिवीगाळ, VIDEO व्हायरल

आयसीसीशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “आज टीम इंडियाची मानसिकता नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याची होती. त्यांनी चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज खेळवले. जर तुमची मानसिकता सकारात्मक असती, तर तुम्ही प्रथम फलंदाजी केली असती आणि बोर्डवर २५० धावा लावण्याकडे पाहिले असते. खूप मोठा विचार करू नका, आधी फक्त २५० आणि २६० धावा कराव्यात आणि जर परिस्थिती चांगली झाली, तर तुम्ही आणखी धावा करण्याचा विचार करू शकला असता.”

हेही वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: ट्रॅव्हिस हेडने रचला इतिहास, ४८ वर्षांनी घडला ‘हा’ अजब योगायोग

ट्रॅव्हिस हेडने आपले सहावे कसोटी शतक झळकावले आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. ट्रॅव्हिस हेड १४६ आणि स्टीव्ह स्मिथ ९५ धावांवर नाबाद आहे. पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी १-१ विकेट्स आपल्या नावावर केली.

Story img Loader