भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने पुन्हा एकदा सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना सौरव गांगुलीने रवी शास्त्री भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. मात्र बीसीसीआय आणि क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्रींवर टाकलेला विश्वास त्यांना सिद्ध करुन दाखवावा लागेल असंही गांगुली म्हणाला.

“रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी योग्य उमेदवार आहे. यावेळी फार कमी अर्ज आल्यामुळे समितीकडे फारसे पर्याय नव्हते. गेले काही वर्ष रवी भारतीय संघासोबत काम करतोय. माझ्यामते इतिहासात इतका दीर्घ कालावधी कोणत्याही प्रशिक्षकाला मिळाला नव्हता. मात्र आता त्याला आपल्यावर टाकण्यात आलेला विश्वास सिद्ध करुन दाखवावा लागणार आहे.” गांगुली एका कार्यक्रमात बोलत होता.

अनिल कुंबळेने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या निवड समितीने पहिल्यांदा शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. यानंतर लाभाचं पद भूषवल्याच्या आरोपांमुळे बीसीसीआयने सौरव-सचिन-लक्ष्मणची समिती बरखास्त केली. यानंतर कपिल देव-अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने कपिल देव यांची प्रशिक्षकपदावर पुन्हा एकदा नेमणूक केली.

Story img Loader