Ravi Shastri reacts to Star Sports’ Best ODI Team of 2023 : सध्या २०२३ या वर्षाचा हा शेवटचा महिना आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा खेळल्या गेल्या. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक ही सर्वात मोठी स्पर्धा होती. ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले. संपूर्ण विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.आता स्टार स्पोर्ट्सने २०२३ चा एकदिवसीय संघ निवडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार स्पोर्ट्सने निवडलेल्या एकदिवसीय संघात ८ भारतीय आणि ३ परदेशी खेळाडूंना स्थान मिळाले आहे. आता स्टार स्पोर्ट्सने निवडलेल्या या वर्षातील एकदिवसीय संघाला टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि सध्याचे समालोचक रवी शास्त्री यांनी विनोद म्हटले आहे. हे वक्तव्य त्यांनी सामन्यादरम्यान समालोचन करताना केले आहे.

रवी शास्त्रींनी वनडे टीम ऑफ द इयरला विनोद म्हटले –

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कॉमेंट्री करताना स्टार स्पोर्ट्सने निवडलेल्या वर्षातील एकदिवसीय संघाला विनोद म्हटले आहे. रवी शास्त्री म्हणाले की, संघातील ८ भारतीय खेळाडू पाहिल्यानंतर फक्त भारतीयांनीच मतदान केल्याचे दिसते. त्यामुळे हा एक विनोद वाटत आहे.

हेही वाचा – World Cup 2024 : युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांना वाटत नाही भारत टी-२० विश्वचषक जिंकू शकेल, पाहा VIDEO

रवी शास्त्रीच्या या कमेंटनंतर यूजर्स सोशल मीडियावर अनेक फनी पोस्ट शेअर करत आहेत. एका युजर्सने टिप्पणी केली, रवी शास्त्री यांनी वर्षातील एकदिवसीय संघाला स्टार स्पोर्ट्सवरील विनोद म्हणून बाद करणे हा प्रसारणाचा माझा आवडता भाग आहे. त्यासाठीच मी शो पाहतो.
या संघात ट्रॅव्हिस हेडच्या अनुपस्थितीमुळे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ट्रॅव्हिस हेडने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध शानदार शतक झळकावले. ट्रॅव्हिस हेडच्या या शानदार खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप फायनल जिंकली. अशा स्थितीत वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात त्याची अनुपस्थिती चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. या संघात केवळ ३ परदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा यांचा समावेश आहे.

स्टार स्पोर्ट्सने निवडलेला वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ –

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन, केएल राहुल, अॅडम झाम्पा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri reacts to star sports best odi team of 2023 in indian 8 players and 3 foreigner vbm
Show comments