India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारतीय संघ धरमशाला येथे न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा २१वा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला तर शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मदचा समावेश करण्यात आला आहे. शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, मात्र या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री म्हणाले की, भारत किवी संघाविरुद्धचा हा सामना हरला तरी फारशी अडचण येणार नाही. त्याचबरोबर रवी शास्त्रींनी एमएस धोनीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनी मोठ्या स्पर्धेत एक सामना गमावण्याच्या बाजूने होता –

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, ‘२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत एक सामना हरला होता. तो सामना लीग सामना होता. पण त्यानंतर भारताने विश्वचषक जिंकला. मला आठवते जेव्हा एमएस धोनी कर्णधार होता तेव्हा त्याने एकदा सांगितले होते की कधीकधी एखाद्या मोठ्या स्पर्धेत एखादा सामना गमावणे चांगले असते. कारण तुम्हाला अचानक उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत जायचे नसते.’

सामना हरल्यानंतर तुम्हाला तुमच्या उणिवांचीही जाणीव होते –

रवी शास्त्री म्हणाले पुढे म्हणाला, ‘तुम्हाला तेथे सर्वकाही व्यवस्थित हवे असते. त्याच्या सांगण्याचा अर्थ असा होता की, सामना हरल्यानंतर तुम्हाला तुमच्या उणिवांचीही जाणीव होते आणि तुम्ही त्यावर काम करून पुन्हा सामन्यात प्रवेश करता. जर तुम्ही सर्व सामने जिंकून सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचलात आणि नंतर तुम्हाला काही उणीवा कळल्या, तर तुम्ही त्यावर लगेच मात करू शकत नाही आणि तिथे ते अवघड होऊन बसते.’

हेही वाचा – IND vs NZ: मोहम्मद सिराजची पुन्हा एकदा कमाल, डेव्हॉन कॉनवेला शून्यावर केले बाद, श्रेयस अय्यरने घेतला अप्रतिम झेल

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने सलग चार वेळा विजय मिळवला आहे आणि संघ पाचव्या विजयाच्या शोधात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये त्यांनी एकूण ५२४ धावा केल्या आहेत. कोहलीची कामगिरी विशेषतः उल्लेखनीय आहे, त्याच्या ४८व्या एकदिवसीय शतकामुळे भारताने बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय मिळवला. टीम इंडियाने २००३ पासून वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. संघ आपला २० वर्षांचा वाईट इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri said dhoni believed that losing at least one match in the league stage of a major tournament is beneficial vbm