Ravi Shastri says about sanju samson I will be disappointed: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. त्यापैकी वनडे संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. यावर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. रवी शास्त्री म्हणाले की, विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात स्थान मिळवणाऱ्या संजू सॅमसनला अद्याप त्याच्या पूर्ण क्षमतेची जाणीव झालेली नाही.

माजी अष्टपैलू रवी शास्त्री पुढे म्हणाले की, या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात भारतीय इलेव्हनमध्ये किमान दोन डावखुरे फलंदाज बघायचे आहेत. विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाईल, ज्याचे वेळापत्रक या महिन्याच्या २७ तारखेला आयसीसी जाहीर करू शकते.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

रवी शास्त्री द वीकशी संजू सॅमसनबद्दल बोलताना म्हणाले की, या फलंदाजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची क्षमता अजून कळलेली नाही. त्याला त्याची क्षमता कळली नाही, तर माझी खूप निराशा होईल. संजू हा सामना जिंकवून देणारा फलंदाज आहे, पण त्याच्याकडून हे पाहिला मिळता नाही. जर त्याने आपली कारकीर्द चमकदारपणे संपवली नाही, तर मी खूप निराश होईल. माझ्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळातही अशी परिस्थिती होती. जर रोहित माझ्या संघात नियमित कसोटी खेळाडू म्हणून खेळला नसता, तर माझी निराशा झाली असती. त्यामुळे संजूबद्दलही माझी अशीच भावना आहे.”

हेही वाचा – IND vs WI: “…तरच हार्दिक पांड्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करावे”, भारताच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

या माजी अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, उजव्या-डाव्या हाताच्या फलंदाजांच्या जोडीने टीम इंडिया योग्य संतुलन साधू शकते. शास्त्री म्हणाले, “पहिल्या सहा फलंदाजांमध्ये संघात किमान दोन डावखुरे फलंदाज असावेत, अशी माझी इच्छा आहे. आपल्याला संघात योग्य संतुलन साधण्याची गरज असेत. तुम्हाला असे वाटते का की डावखुरा फलंदाज शीर्षस्थानी अतंर निर्माण करेल? यासाठी सलामीवीर असण्याची गरज नाही, पण तो अव्वल तीन-चार फलंदाजांमध्ये असायला हवा. आपल्याला सर्व पर्यायांचा विचार करावा लागेल. मला अव्वल सहा फलंदाजांमध्ये दोन लेफ्टी फलंदाज पाहायला आवडेल.”

रवी शास्त्री पुढे म्हणाले, “सध्या देशात उच्च दर्जाचे डावखुरे फलंदाज आहेत आणि संघातील कोणत्याही वरिष्ठ खेळाडूची जागा घेण्यास ते तयार आहेत. तुमच्याकडे इशान किशन आहे. विकेटकीपिंगमध्ये तुमच्याकडे संजू सॅमसन आहे, पण लेफ्टी बॅट्समनमध्ये तुमच्याकडे जैस्वाल, टिळक वर्मा आहेत. दोघेही असे फलंदाज आहेत जे वरिष्ठ खेळाडूंची जागा घेऊ शकतात.”

Story img Loader