Ravi Shastri on Hardik Pandy captaincy in limited overs cricket: टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याच्या कसोटी कारकिर्दीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हार्दिकला कसोटी क्रिकेट खेळता येणार नाही. कारण त्याचे शरीर जास्त मोठा फॉरमॅट हाताळू शकत नाही. शरीर तंदुरुस्त असेल तरच हार्दिक विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पंड्याला कॅरेबियन दौऱ्यावर वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेतही तो उपकर्णधार होता.

शास्त्री यांनी हार्दिकबाबत केलेले विधान महत्त्वाचे आहे. कारण ते राहुल द्रविडपूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या सेटअपचा ते महत्त्वाचा भाग होते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, हार्दिकने कसोटी क्रिकेटमध्ये खेळावे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ
Alzarri Jospeh Banned for 2 Matches by West Indies Cricket Board For On Field Argument with WI Captain Shai Hope vs England ODI Match
अल्झारी जोसेफला रागात मैदान सोडणं पडलं भारी, क्रिकेट वेस्टइंडिजने केली मोठी कारवाई

हार्दिक पांड्याबद्दल काय म्हणाले रवी शास्त्री?

रवी शास्त्री यांनी ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदी खेळणे याबद्दल सांगितले, “त्याचे शरीर कसोटी क्रिकेटचा भार सहन करू शकत नाही. याबाबत खूप स्पष्टता हवी. विश्वचषकानंतर त्याचे शरीर तंदुरुस्त असेल तर त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारावे.”

हेही वाचा – ODI WC 1983: लतादीदींचे भारतीय क्रिकेटवर आहेत खास ‘उपकार’, जाणून तुम्हीही कराल सलाम

वरिष्ठ खेळाडूंच्या जागी युवा खेळाडू तयार आहेत –

भारतीय क्रिकेटमधील वरिष्ठ खेळाडूंना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याची वेळ आली आहे, असेही रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. तो म्हणाला, “तरुण खेळाडू काही वरिष्ठ खेळाडूंची जागा घेण्यास तयार आहेत. टी-२० क्रिकेटचा विचार केला, तर यात शंका नाही. त्याचबरोबर ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये कमी आणि कसोटीत त्याच्यापेक्षा कमी.”

हेही वाचा – अदानी समूहाने ODI World Cup 2023 साठी सुरु केली ‘जीतेंगे हम’ मोहीम, कोण-कोण होते सहभागी? जाणून घ्या

युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटबाबत केले सतर्क –

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगला क्रिकेटपटू असल्‍याने कसोटी संघामध्ये जागा मिळण्‍याची हमी मिळत नाही, असे मानणार्‍या तरुणांना रवी शास्त्री यांनी कडक ताकीद दिली आहे. रवी शास्त्री म्हणाले, “आयपीएलमुळे तुम्हाला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडू पाहायला मिळतात. पण यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची निवड होईल, असे त्यांना वाटू नये. मला रणजीतील रेकॉर्ड बघायला आवडेल. मी निवडकर्त्यांसोबत बसून (रणजीतील कामगिरी) कोणाच्या विरुद्ध होती, कोणत्या परिस्थितीत, त्याची ताकद काय आहे आणि त्यांचा स्वभाव कसा आहे याबद्दल अधिक माहिती घेईन.”