भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा अजुनही कायम आहेत. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. यानंतर निवड समितीने धोनीला भारतीय संघात स्थान दिलेलं नाही. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता, धोनी भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत. मात्र अशा परिस्थितीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केलं आहे.

अवश्य वाचा – धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत

“तो पुन्हा कधी खेळायला सुरुवात करतोय आणि आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टीरक्षकांची कामगिरी आणि धोनीची कामगिरी या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. आयपीएल ही मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेनंतरच तुमचा विश्वचषकासाठीचा १५ जणांचा संघ कमी-अधिक प्रमाणात पक्का होईल.” IANS वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.

२०२० सालात आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. याबद्दल बोलत असताना शास्त्री म्हणाले, “एखादा खेळाडू दौऱ्यात जखमी झाला तर पर्यायी खेळाडू म्हणून काहींचा विचार होऊ शकतो. मात्र तो खेळाडू कोण असेल याविषयी अंदाज बांधत राहण्यापेक्षा आपण आयपीएलपर्यंतची वाट पाहूया. यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.”

Story img Loader