Ravi Shastri’s Reaction to KL Rahul: आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यासाठी आता २ आठवडे बाकी आहेत. ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची घाई करू नये, अन्यथा जसप्रीत बुमराहच्या बाबतीत जे घडले तेच घडेल, असे मत व्यक्त केले.
केएल राहुल, श्रेयस अय्यर एनसीएमध्ये आहेत आणि रिहॅब प्रक्रियेतून जात आहेत. जसप्रीत बुमराह बराच काळ एनसीएमध्ये होता आणि आता तो आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. राहुल आणि अय्यर यांना मोठ्या स्पर्धेत पाठवण्यापूर्वी त्यांनी काही सामने खेळले पाहिजेत, असे रवी शास्त्रीचे मत आहे. आशिया चषकापूर्वी त्यांना काही सामने खेळण्याची परवानगी द्यावी, असे शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सच्या सिलेक्शन डे कार्यक्रमात सांगितले.
दुसरीकडे, केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे एमएसके प्रसाद यांचे मत आहे. ते म्हणाले, मी गेल्या एका आठवड्यापासून एनसीएमध्ये आहे आणि केएल राहुलला खेळताना पाहत आहे. तो खेळला आहे. त्यांनी राहुलसाठी यापूर्वीच २ सामने आयोजित केले होते. संदीप पाटीलही रवी शास्त्री यांच्याशी सहमत असल्याचे दिसून आले. ते म्हणाले, नेटमध्ये खेळणे आणि मॅच खेळणे यात खूप फरक आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “जेव्हा तुम्ही अशा खेळाडूबद्दल बोलत आहात, जो खेळला नाही आणि दुखापतीतून सावरत आहे. आशिया चषकासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये विचारात घेण्यासाठी, तुम्ही खेळाडू स्वत: खेळाडूंकडून खूप काही विचारत आहात.” जसप्रीत बुमराहचे उदाहरण देताना रवी शास्त्री यांनी दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंची घाई करणे किती घातक ठरू शकते हे सांगितले. माजी प्रशिक्षक म्हणाले, “तुम्ही एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर पुनरागमन करताना घाई करू शकत नाही. तुम्ही जसप्रीत बुमराहसोबत हे एकदा नाही, दोनदा किंवा तीनदा केले आणि त्यानंतर तो १४ महिने बाहेर राहिला होता.”
राहुल आणि अय्यर ८० टक्के फिट –
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या आठवड्याच्या सुरुवातीला ‘इनसाइडस्पोर्ट’ला सांगितले की, “आम्ही अजून दुखापतींच्या अपडेटची वाट पाहत आहोत. राहुल आणि अय्यर ८० टक्के तंदुरुस्त आहेत पण मॅच फिट नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा हे क्लिअर झाल्यानंतर संघ घोषित केला जाईल.”
आशिया चषकासाठी स्टार स्पोर्ट्स तज्ञांचा संघ –
इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.