येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाकडून राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या पदांसाठी जाहिरात दिली जाणार असून, भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यासह संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधरसुद्धा अर्ज करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या काही दिवसांत प्रशिक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. शास्त्रीसह फलंदाजीचे प्रशिक्षक बांगर, गोलंदाजीचे प्रशिक्षक अरुण आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर अर्ज करणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या आदल्या दिवशी सर्व सहयोगी प्रशिक्षकांनी त्यांची भेट घेतली होती. या पदासाठी योग्यता असलेल्या प्रत्येकाने अर्ज करावेत, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले होते. शास्त्री यांच्या १८ महिन्यांच्या कार्यकाळातील कामगिरीबाबतही ठाकूर यांनी समाधान प्रकट केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri with assistant coach also apply for indias coach