Ravi Shastri’s big revelation about Virat Kohli : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीबाबत मोठा खुलासा केला आहे. शास्त्री यांनी सांगितले की, जेव्हा ते संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा २०१९ च्या विश्वचषकात विराटला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा विचार केला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कोहलीने २०११ च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तेव्हा स्टार फलंदाजाची चौथ्या क्रमांकावरील सरासरीही प्रभावी राहीली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १७६७ धावा केल्या आहेत. यादरम्यान ३९ सामन्यांमध्ये त्याची सरासरी ५५.२१ इतकी होती. विराटने चौथ्या क्रमांकावर सात शतके आणि आठ अर्धशतकेही झळकावली आहेत. एका टीव्ही कार्यक्रमात विश्वचषकासाठी भारताच्या संघाची चर्चा करताना, शास्त्री म्हणाले की त्यांना पहिल्या चारमध्ये लवचिकता हवी होती आणि कोहली संघाच्या हितासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. त्यांना संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये बदल हवा होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीच्या नावार चांगली आकडेवारी आहे.

रवी शास्त्रींचा विराट कोहलीबद्दल खुलासा –

रवी शास्त्री म्हणाले, “विराटला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल, तर तो संघाच्या हितासाठी असे करेल. मी अनेक वेळा याचा विचार केला आहे. अगदी गेल्या दोन विश्वचषकांमध्येही. २०१९ मध्ये जेव्हा मी प्रशिक्षक होतो, तेव्हा मला वाटले की त्याने कदाचित एमएसके प्रसाद यांच्याशी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत चर्चा केली असेल. जेणेकरुन भारी-भरभक्कम टॉप ऑर्डर मोडता यावी.”

हेही वाचा – IND vs WI : “टीम इंडियाला लाज वाटू नये, कारण…”; टी-२० मालिकेतील पराभवावर सुनील गावसकरांचे वक्तव्य

गेल्या दोन विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताचा पराभव –

शास्त्री पुढे म्हणाले, “तुम्हाला माहिती आहे, कारण जर आपण टॉप ऑर्डरमधील दोन किंवा तीन विकेट गमावल्या, तर आपली टीम सामन्यातून बाहेर पडायची. जर तुम्ही विराट कोहलीचा रेकॉर्ड बघितला, तर तो चौथ्या क्रमांकावर खूप चांगला आहे.” भारतीय संघाने २०११ नंतर विश्वचषक जिंकलेला नाही. २०१५ आणि २०१९ मध्ये टीम इंडिया उपांत्य फेरीतून बाहेर पडली होती. २०१५ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. तसेच, २०१९ मध्ये कोहली कर्णधार होता आणि टीम न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होऊन बाहेर पडला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastris revelation about virat kohlis batting order in the 2019 world cup vbm